भारत न्यूज 1 नाशिक
राज्यातील पर्यायी बाजार व्यवस्था तसचे कृषि उत्पन्न बाजार समित्यांचा अभ्यास करण्यासाठी गठीत केलेल्या माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट अभ्यासगटाच्या शिफारशी शासनास सादर करण्यात आल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मंत्री मंडळातील सहकारी यांच्या उपस्थितीत माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी अभ्यास गटांच्या शिफारशी शासनास सादर केल्या.
खाजगी बाजार, थेट पणन परवाना, शेतकरी ग्राहक-बाजार.ई-व्यापार व्यासपीठ (e-Trading Platform) तयार करणे, कंत्राटी शेती. कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार व कृषि उत्पन्न बाजार समिती यांचा तुलनात्मक अभ्यासातील महत्वाच्या बाबी, किमान आधारभूत किंमती, राज्यातील कृषि पणन विभागाचे बळकटीकरण आणि पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद, राज्यातील कृषि पणन व्यवस्थेत भविष्याचा वेध या महत्त्वाच्या शिफारशी शेतकरी हित केंद्रबिंदू मानून अभ्यासगटांने केल्या आहेत.