भारत न्यूज 1 नाशिक
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बिटको हायस्कूल हुतात्मा स्मारका शेजारील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास जिल्हाधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व स्मिता झगडे,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास व मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व स्मिता झगडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर राज्य गीताचे गायन करण्यात आले.
यावेळी शिवगर्जना व शिवस्तुती आस्थापना विभागातील कर्मचारी वामन पवार यांनी सादर केली. यावेळी कार्यक्रमास उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, श्रीकांत पवार, डॉ.विजयकुमार मुंडे, प्रशांत पाटील,नितीन नेर,शहर अभियंता शिवकुमार वंजारी,वित्त व लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट,शिक्षणाधिकारी बी.टी पाटील,घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड,उद्यान अधीक्षक विवेक भदाणे,अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत,बाजीराव माळी,कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, जितेंद्र पाटोळे,मिळकत व्यवस्थापक जयवंत राऊत,विभागीय अधिकारी योगेश रकटे, सहा.नगरसचिव किशोर कोठावळे, आयुक्तांचे स्वीय सचिव दिलीप काठे, अधीक्षक रमेश बहिरम ,स्विय सचिव कैलास दराडे,जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,उद्यान निरीक्षक किरण बोडके,नितीन गंभीरे,जयश्री गांगुर्डे,सोनल पवार, वीरसिंग कामे ,सागर पिठे आदींसह अधीकारी कर्मचारी उपस्थित होते.
*विभागीय आयुक्त यांच्या हस्ते नाशिक रोड येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण*
नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी नाशिक रोड विभागीय अधिकारी जवाहरलाल टिळे यांचे सह विभागीय आयुक्त कार्यालय व मनपा नाशिक रोड विभागीय कार्यालय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरास भेट दिली.त्यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.