भारत न्यूज 1 नांदेड जिल्हा प्रतिनिधी
आरक्षणासाठी बळी गेलेल्यासांठी सरकार जबाबदार
अजितदादा आणि छगन भुजबळ यांच्या वर डागली तोफ
मराठा आरक्षणाचा विषय अंतीम टप्यात आला आहे. युवकांचे बळी गेले त्याला सरकार जबाबदार दार आहे. व युकांनां जरागे पाटील यांनी सल्ला दिला आमी तुमच्या साठी आरक्षण मागतोय तुमचा बळी गेल्याने आरक्षनाचा उपयोग काय…. नुसता आरडाओरडा करून चालणार नाही… मराठ्यांना वेढा आणि षढयंत्र तोडल्या शिवाय मराठ्याना गत्यंतर नाही.. असे मत मनोज जरांगे पाटील यांनी नायगाव येथील सभेत व्यक्त केले आहे.
दि. 8 डिसेंबर रोजी नायगाव येथे मराठा संघर्ष योद्धा यांची सभा संपन्न झाली. याप्रसंगी शहरात शिवाजी चौक ते सभेच्या व्यासपीठा पर्यंत त्याच्यावर पुष्पवृष्टी करून सभास्थळी 51 तोफांची सलामी ही देण्यात आली. यावेळी सभास्थळी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून सभेला सुरवात केली. पुढे बोलताना त्यानी अजितदादा पवार व छगन भुजबळ यांच्या वर ही जोरदार टीका केल्या मराठा ही जात जगाचा पाटीवर शांत आहे, पन ऐखांद्याच्या पाटीमागे लगलो तर शांत बसनार नाही. आसा ईशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. प्रत्येक आई वडीलांच स्वप्न पुर्णकरण्यासाठी ही संधी आली आसुन आपल्या पाठीशी कोनी नाही. हा लढा आपल्याला लढायचा आहे. सद्या आपली गत अशी झाली, शेती आपल्याला साथ देत नाही. निसर्ग पिच्छा सोडत नाही, शिकूण घरी राहाणे परवडणारे नाही.
आई वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. जागे व्हा… ही वेळ खुप मोलाची आहे.. ऐकजुट व्हा… मराठा समाजाने व्यसनापासुन दूर राहा दारु सोडा आसे पहील्यादाच सांगीतले महाराष्ट्र मराठ्याचा सातबारा आसुन येथील शाळा, महाविद्यालये,दवाखाने, बसस्थानक, सरकारी कार्यालये यास आपल्या जमीनी फुकट दिल्यात. हे सांगून झगण भुजबळांचा चिमटा काढला.. आता मराठ्यानी मुंबई येथे जाण्यासाठी तयार राहावे माझा जीव गेला तरी चालेल मी माझ्या आईवडीलांना सांगीतलो मी मेलो तर तीन मुलांवर समाधान मानावं बायकोला कपाळ पुसुन बस अस सांगितलय… माझ्या जीवाची बाजी लावणार.. एक पाउल सुधा मागे हटनार नाही… मेलो तर चार कोटी समाजाचा वाचलो…. तर तुझा असे सांगुन घराच्या बाहेर निघालो… आरक्षणाक्षीवाय पर्याय नाही.. आणि ते घेतल्या शिवाय स्वस्त बसनार नाही… आरक्षण तर भेटु दे मग तुला दाखवतो (छगन भुजबळ) हिसोब करु असा टोला मंत्री छगन भुजबळ यांना लगावला.. यांचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावरही ताशेरे ओढले.
सत्तर वर्षापासुन मराठा समाजाला आरक्षन मिळात नाही म्हणून कालपासुन मराठ्याचा ३५ लाख नोदीं सापडल्या आसुन सर्वाना आता जातीची प्रमाण पत्र मिळत आहेत. पण आपणास सरकट आरक्षण हवे आहे. ते मिळे पर्यत मी गप्प बसनार नाही. असे सांगत उपस्थित समुदायास संबोधित केले. सभेस लाखोंचा जनसागर उसळल्याने ही शहरातील पहिलीच विक्रमी सभा ठरली.
![Bharat News1](https://secure.gravatar.com/avatar/b456ec41578bec6e8f2757e0ad057200?s=96&r=g&d=https://bharatnews1.com/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)