भारत न्यूज 1 नांदेड जिल्हा प्रतिनिधी
राजस्थान येथील राष्ट्रीय करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची 5 डिसेंबर रोजी गुंड प्रवृत्तीच्या लोका कडून धोका देऊन भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ दि.7 डिसेंबर रोजी कोलंबी येथील सकल राजपूत बांधवाकडून पूर्णपणे कडकडीत बंदपाळण्यात आला.
राजस्थान सह देशभरात करनिसेने च्या माध्यमातून अत्यन्त प्रभावी काम करणारे व राजपुत समाजात एक वेगळे अस्तित्व असलेले करणी सेनेचे काम आहे या मध्ये एक प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेले सुखदेव सिंह गोगमेडी यांची गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी धोका देऊन गोळ्या घालून हत्या केली.
या घटनेचा निषेध करीत कोलंबी येथील राजपूत समाजाच्या युवकांच्या वतीने कोलंबी गावात फेरी काढून सर्व व्यापारी, शाळा, कॉलेज,दुकान,हॉटेल,प्रतिष्ठाने,यांना विनंती करीत बंदचे आवाहन केले. त्यांना प्रतिसाद देत गुरुवारी कोलंबी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
श्री श.च.हा.कोलंबी येथे राजपूत युवा प्रतिष्ठान व मु.अ. व शाळा कर्मचारी,विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली व शाळा बंद ठेवण्यात आली.नायगाव तालुक्यात एकमेव गाव असलेल्या कोलंबी येथेच बहुसंख्य राजपूत समाज असल्याने बंद कडकडीत व शांततेत पार पडला. इतरत्र हा बंद दिसून आला नाही.