भारत न्यूज 1 छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी
कन्नड तालुक्यातील भिलदरी शफियाबाद जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थी व शिक्षकांनी पूर्ण गावात रॅली काढून गावातल्या गल्ल्यात स्वच्छता अभियान राबविले. काडी कचरे व घास गवत काढून जमा केले. ग्रामपंचायत समोर लावलेल्या झाडांना आळे करणे काडीकचरा उचलणे व अभ्यासिकेसमोर स्वच्छता करणे असे काम सर्व शिक्षकांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “एकदा स्वच्छता करून चालणार नाही यासाठी सातत्याने आपल्याला दारासमोर व आजूबाजूला स्वच्छता ठेवावी लागेल तरच गाव स्वच्छ होईल व रोगराई नष्ट होईल असे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरासमोर दोन झाड तरी लावावे, त्यांची देखरेख करावी व त्यांना पाणी द्यावे असेही त्यांना सांगितले यावेळीविद्यार्थ्यांना घरासमोर दोन झाड तरी लावण्याची शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्राथमिक शाळेचे शिक्षक व शिक्षिका, शाळेतील विद्यार्थी, शाळा समितीचे अध्यक्ष, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सरपंच शोभाताई कोटवाळे, उपसरपंच विजय वैष्णव , पोलीस पाटील दिलीप महेर, ग्रामसेवक पवार साहेब, गांधी गोटवाल , जयलाल बम्हनावत, गोकुळ कायटे, राहुल तायडे, भीमराव दवंगे, अजय शेलार, जमिल शहा, चंपालाल राजपूत, चरण राजपूत, संतोष महेर, चंदन राजपूत, गोविंद कायटे, जादू महेर, बाबूलाल महेर, भरत सुलाने, या सर्वनी व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.