भारत न्यूज 1 संपादक देवराज सोनी
नाशिक शहर अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल उन्नीस मोटरसायकल चोरी करणारे चोरटे जेरबंद पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा शोधक पथकाची उल्लेखनीय कामगिरी
अंकुश शिंदे पोलीस आयुक्त नाशिक शहर किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडल एक नाशिक शहर नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस स्टेशन अनिल शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित केदार व पथक यांना पंचवटी पोलीस ठाणे तसेच पोलीस उपायुक्तातील मोटरसायकलचे चोरीचे गुन्हे उघडकस आणणे बाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या.
दिनांक 14 9 2023 रोजी पहाटे 3:45 वाजता सुमारास सहायक पोलीस उपनिरीक्षक डीएम वनवे पोलीस हवालदार सागर कुलकर्णी निलेश गोइल दीपक नाईक कैलास शिंदे संदीप माणसाने विष्णू जाधव वैभव परदेशी असे रात्रगस्त करीत असताना एक इसम हा काट्या मारुती चौक पंचवटी नाशिक येथे येणार असल्याचे समजल्याने सदर पथकासह काट्या मारुती चौकाच्या आजूबाजू सापळा लावून थांबले असता तिथे एक संशयित इसम हा विना नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन जाताना मिळून आला त्यास पथकाने थांबवलेले असता तो पडून जाऊन लागला तेव्हा त्याच्या पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे त्याच्या ताब्यातील मोटरसायकल बाबत विचारले असतात त्याने काहीएक माहिती न देता उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने संशय येऊन अधिक तपास केला असता त्याने त्याचे नाव राजू प्रकाश पिंगळे वय 40 वर्ष राहणार बाजीराव गोतकर वस्ती सनन हॉस्पिटलच्या पुढे शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर असे सांगून सदरची मोटरसायकल त्यांनी त्याच्या साथीदार शोएब गफूर शेख वर्ष 24 वर्ष राहता नांदूर मध्येश्वर रोड शेखवस्ती तासदिंडोरी गाव तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्यासह राहता जिल्हा अहमदनगर येथून चोरी केल्याने समजले. तेव्हा त्याच्याकडे पोलीस शिपाई विष्णू जाधव व संतोष पवार यांनी सखोल चौकशी करून नाशिक शहर व इतरत्र अजून काही मोटरसायकल चोरी केले आहेत याबाबत माहिती घेतली असता त्याने व त्याच्या साथीदार शोयब शेख यांनी नाशिक औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यातुन वेगवेगळ्यआ कंपनीच्या 19 मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा साथीदार शोयब गफूर शेख याचे कडुन त्याचे राहते घरा जवळुन मोटरसायकल हस्तगत करण्यात आले असुन दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.