भारत न्यूज 1 नांदेड जिल्हा प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तथा नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार यांचे कट्टर समर्थक माधव पाटील कल्याण यांची भाजपाच्या नायगाव शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नायगाव शहरातील भाजपचे कार्यकर्ते तथा आ.राजेश पवार यांचे खंदे समर्थक माधव पाटील कल्याण यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची भाजपच्या नायगाव शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून सदर निवडीचे नियुक्तीपत्र आ.राजेश पवार यांच्या हस्ते यांना देण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नांदेड जिल्हा दक्षिण महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.पुमताईताई पवार व मित्र मंडळी उपस्थित होते माधव पाटील कल्याण यांची नायगाव शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे तसेच वाटसप व फेसबुकवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.