मराठा आरक्षणास नैताळे येथील वाल्मिक बोरगुडे पाटील यांचे सरणावरील उपोषण आंदोलनास रिपब्लिकन पक्ष व अ.आ.नि.स.चा पाठींबा.
मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या जोरावर सरकारला चांगलंच अडचणीत आणलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालन्यात सुरु असलेल्या उपोषणास पाठींबा दर्शवण्यासाठी निफाड तालुक्यातील नैताळे येथील सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक बोरगुडे पाटील हे चार दिवसांपासून सरणावर बसुन उपोषणास बसलेले असुन त्यांचे आंदोलनास रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष व अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचेसह पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन लेखी पाठींबा जाहीर केला. या प्रसंगी समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष वसंतराव वाघ, जिल्हाध्यक्ष संजयबाबा गायकवाड, तालुकाध्यक्ष सुरेशभाई डांगळे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष शिवाजीराव आहीरे, निफाड तालुका कार्याध्यक्ष विनोद गायकवाड, नैताळे अध्यक्ष छबुराव खरे आदी उपस्थित होते.