Search
Close this search box.

हिंगणघाट जिल्हा निर्मितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन

भारत न्यूज 1 रीपोटर्र योगेश लखोटे – वर्धा(हिंगणघाट)

हिंगणघाटच्या तहसील कार्यालयासमोर देण्यात आले धरणे

*विदर्भातील सर्वात मोठा तालुका असलेल्या हिंगणघाटला जिल्हा घोषीत करावा……राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी…*

*हिंगणघाट तालुका जिल्हा व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकदिवसीय धरणे आंदोलन….*

*उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली मागणी…!*

हिंगणघाट तालुक्याला जिल्हा घोषित करा याकरीता काही दिवसांपूर्वी राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते की, विदर्भातील सर्वात मोठा तालुका म्हणून हिंगणघाट शहराची ओळख आहे व या शहराची लोकसंख्या ही पावणे दोन लाख आहे. तसेच या शहराच्या विधानसभा मतदार संख्या हे एक ते सव्वा लाख च्या जवळपास आहे. जर आपण हिंगणघाट तालुक्याची लोकसंख्या बघितली तर ती चार लाख आहे व ही लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. तसेच हिंगणघाट शहराला ब्रिटीशकाळापासूनच औद्योगिक शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते व या शहरात मोठी बाजारपेठ मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हिंगणघाट शहरातील कृषि उत्पन्न बाजार समिती प्रथम क्रमांकाची आहे. हिंगणघाट शहर हे जिल्ह्याला सर्वात मोठा महसुल देणारे शहर आहे. भारतातील सर्वात मोठा नॅशलन हायवे नं. ४४ हा हिंगणघाट शहराच्या मधोमधून गेला आहे. हिंगणघाट शहरात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आहे. येथील १०० बेडचे उपजिल्हा उपरुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला असून ४०० बेडच्या रुग्णालयाला मंजूरी मिळाली आहे. तसेच हिंगणघाटमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या मागणीसाठी शहरातील नागरिकांचा लढा सुरुच आहे. हिंगणघाट शहरात समाजसेवी बाबा आमटे यांचे जन्मस्थान आहे. तसेच ग्रेट ट्रिग्नोमॅट्रीकल सर्वे ऑफ इंडीया जनक कर्नल विल्यम लॅम्बटन यांचे स्मृतीस्थळ आहे.
हिंगणघाट शहराला विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यांच्या सिमा लागून आहे. तसेच हिंगणघाट शहराच्या मधोमधून भारतातील सर्वात मोठा रेल्वे मार्ग कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत जोडला गेला आहे. इंग्रज काळात नागपूर नंतर मोठ्या १० हजार कामगारांना रोजगार देणाऱ्या या परिसराला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर घरघर लागली ते दोन्ही मोठे कापड गिरण्या आहे. तसेच हिंगणघाट शहरात छोट्या मोठ्या गिरण्या व मोठ्या प्रमाणात जिगींग, मोठ्या प्रमाणात नॅशलनालाईज बँका व मोठ्या प्रमाणात पतसंस्था उपलब्ध आहे. हिंगणघाट हे वर्धा, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यांच्या मध्यभागी असून शहराला राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेमार्ग जुळून आहे.
सध्या राज्यात कोणकोणते शहर तालुके व जिल्हे होऊ शकतात, याची चाचपणी सुरु आहे. तसेच छोटे – छोटे तालुके जिल्हा होण्याच्या मार्गावर आहे तर मग हिंगणघाट तालुका जिल्हा का नको ? ही हिंगणघाट शहराची शोकांतिका आहे की, शासनाच्या नवजिल्हा निर्मिती यादीत १९ तालुक्यांची नावे आहे परंतु हिंगणघाट तालुक्याचे नाव समाविष्ट नाही. इतर राज्यातील तुलनात्मक अभ्यास केला तर आंध्र प्रदेशातील सरकारने एका दिवसात १३ नव्या जिल्ह्यांची निर्मिती केली. तर राजस्थान सरकारने १९ नविन जिल्ह्यांची निर्मिती केली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य निर्मितीपासून लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याने नागरीकांना चांगल्या सोई-सुविधा देता याव्यात या करीता वर्धा जिल्ह्यासह लगतच्या नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्याचे विभाजन करुन या तीन्ही जिल्ह्यांच्या सिमेलगत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा देण्याची आज गरज आहे.
वरिल बाबी लक्षात घेता हिंगणघाट तालुका जिल्हा होण्यासाठी सक्षम आहे. म्हणून हिंगणघाट तालुका जिल्हा म्हणून घोषित करावा या रास्त मागणीसाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शहरातील नागरिकांतर्फे धरणे आंदोलन तहसिल कार्यालय परिसरात केले आहे. करिता लवकरात लवकर हिंगणघाट तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त व्हावा अन्यथा हिंगणघाट तालुका जिल्हा होत नाही तो पर्यंत आमचा लढा सुरूच राहील.
यावेळी :-जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, रफिकभाई पत्रकार, माजी पंचायत समिती सभापती वासुदेव गौळकर, पुंडलिकरावजी बकाने, श्री दाभने गुरुजी, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, माजी न.पा.सदस्य, तथा शिक्षण सभापती अनिलभाऊ भोंगाडे, अल्पसंख्याक सेल जिल्हा उपाध्यक्ष जावेद मिर्झा, युवा सेना जिल्हाध्यक्ष अभिनंदन मुनोत, भोला निखाडे, सुभाष चौधरी, उपसरपंच कलोडे, श्री संतोषजी तिमांडे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष श्री संजयजी काकडे, पत्रकार अब्दुल रज्जाक भाई, वडनेर उपसरपंच सुभाष शिंदे, टेंभा उपसरपंच प्रविण कलोडे, समाजसेवक श्याम इडपवार, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, राजेश भाईमारे, संघर्ष समिती अध्यक्ष सुनील पिपळकर सर, अनिल लांबट, संदीप निंबाळकर, अमोल बोरकर, मारोती महाकाळकर, तालुका उपाध्यक्ष शरद कुळसंघे, सुनील भुते, अजय पर्बत, समाजसेवक सचिन धारकर सर, गोमाजी मोरे, किशोर चांभारे, प्रवीण श्रीवास्तव, तालुका उपाध्यक्ष, सुधाकर वाढई, उमेश निवारे, जगदीश वांदिले, बबलू शेख, युवक जिल्हा सचिव हर्षल स्यामुअल, बालूभाऊ, कुणाल ऐसबंरे, पुरुषोत्तम कांबळे, विक्रांत भगत, नामदेव देवतळे, पद्माकर अतकर, समाजसेवक विजयभाऊ तामगाडगे महिला शहर अध्यक्षा मृणालताई रिठे, महिला हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष सौ निताताई गजभे, सिमाताई तिवारी, सौ विद्याताई गिरी, सुजाताताई जांभूळकर, भारतीताई घुंगरूड, दिपालीताई रंगारी, सौ रजनीताई महाकाळे, तीनाताई दयाल, सौ शितलताई माटे मॅडम, सौ वृषालीताई काळे, चंदाताई येलेकर, श्री प्रमोद नव्हते, युवक विधानसभा उपाध्यक्ष प्रशांत लोणकर, अमित रंगारी, नंदू वाघमारे, पंकज भट, नितीन भुते,अनिल भुते, बच्चू कलोडे, सुभाष सोयाम, नरेश चिरकुटे, राहुल जाधव, रविकिरण कुटे, सुशील घोडे, प्रशांत मेश्राम, संजय कांबळे, नदीम भाई, शेखर ठाकरे, श्रीराम डहाने, साजन कांबळे, राहुल फुलझेले, वैभव साठोणे, प्रशांत एकोणकर, पप्पू आष्टीकर, दीपक चांगल, गोलू भुते, अरविंद ठाकरे, नितेश नवरखेडे, परम बावणे, गजानन महाकालकर, गोपाल कांबळे, राजू मेसेकर, सचिन पाराशर, हरिभाऊ शिरसागर, मनोज कलोडे, अमोल मुडे, दिनेश नगराळे, आकाश बोरीकर, धनराज टापरे, रोहित लेदे, नंदू काळे, रवी बोरकर, विशाल मुंजेवार, आशिष मंडलवार, रोहित बक्षी, मो. शाहीद, प्रविण जंनबंधू, शाहरुख बक्ष, होमा वांदिले, आधी पधाधिकारी, कार्यकर्ते, व शहरातील नागरिक उपस्थित होते.
*दुर्भाग्य आहे आपल्या हिंगणघाट शहरातील, तालुक्यातील जनतेच येथील शहरातील, लोकसंख्या पावणे दोन कोटी तर तालुक्याची जवळ – जवळ 4 कोटीच्या घरात आहे लोकसंख्येच्या दृष्टीने व्यापाराच्या दृष्टीने तसेच मूलभूत सोयी -सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टीने हिंगणघाट तालुका हा जिल्हा होणे गरजेचं आहे. सागण्याचं तात्पर्य असे की ८ कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यस्थानात जर ५० जिल्हे असू शकतात तर १४ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात केवळ फक्त ३६ जिल्हे मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून लहान जिल्हा निर्मिती केल्यास जनतेची प्रशासकीय कामे सोपे होतील व विकास कामाला ही वेग मिळतील असे मनोगत अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँगेस पार्टी ने व्यक्त केलंय

Bharat News1
Author: Bharat News1

भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।

वेब पोर्टल चैनल:- https://bhartnews1.com
यूट्यूब चैनल:- https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
व्हाट्सएप चैनल :- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like

Read More