*धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार* – मुख्यमंत्री यांची ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात घोषणा November 22, 2023
नंदुरबार येथे जनजाती गौरव दिवस आणि राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन November 16, 2023
नाशिक महानगरपालिकेत राष्ट्रीय संकल्प दिवस व राष्ट्रीय एकता दिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन October 31, 2023
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ने मुंबई में उद्योग-व्यापार के अग्रणियों के समक्ष वाइब्रेंट गुजरात समिट की दो दशकों की प्रभावशाली सफल गाथा पेश की October 13, 2023
મહેસાણાના ઉંઝામા સરદાર પટેલ ટાઉન હોલ ખાતે ભાજપા નો યશસ્વી બુથ કાર્યકર્તા સન્માન સમારોહ September 25, 2023
भारत न्युज १ रिपोर्टर योगेश लखोटे -वर्धा ( हिंगणघाट )* हिंगणघाट मेडिकल कॉलेज साठी अर्ध नग्न आंदोलन करून महाराष्ट्र शासनाचा आणि स्थानिक लोक प्रतिनिधीचा जाहीर निषेधहिंगणघाट :- हिंगणघाट येथील आंबेडकर चौक येथे गेल्या १०० दिवसा पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मागणी करिता धरणे आंदोलन सुरु आहे पण अजून पर्यंत सरकार, स्थानिक आमदार आणि जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही. इतकच नव्हे तर आमदार साहेबांनी साधी एकदा पण ह्या अराजकीय आंदोलनाला भेट देऊन विचारपूस सुद्धा केली नाही त्यामुळे हिंगणघाट तालुक्यातील लोकांमध्ये स्थानिक आमदार आणि प्रशासन विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अजून पर्यंत मेडिकल कॉलेज चे स्थान हिंगणघाटला घोषित करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचा अध्यक्षतेखालील उपसमितीने निर्णय न घेतल्यामुळे १०० व्या दिवशी शासनाचा आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधीचा निषेध म्हणून अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले.ह्या दिवशी मागणी लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करून लवकरच संघर्ष समिती कडून ८-१० हजार लोकांचे मोठ जन आंदोलन उभ करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला. स्थानिक आमदार साहेबांनी जर प्रामाणिक पाठपुरावा केला असता तर आज आंदोलन करण्याची वेळ आली नसती .मागील कित्तेक वर्षापासून हिंगणघाट तालुका हा उच्च शिक्षणाच्या आणि आरोग्य सुविधेपासून वंचित आहे.तसाच हाल रोजगाराच्या बाबतीत आहे.ह्या तिन्ही क्षेत्राकडे निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्षच होत आहे.त्यामुळे हिंगणघाट तालुक्याचं विकास झाला अस म्हणणं योग्य ठरणार नाही.येथील तरुणांना उच्चशिक्षण मिळत नसल्यामुळे बेरोजगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.उच्च दर्जाच्या आरोग्याच्या सुविधा नसल्यामुळे कित्तेक रुग्णांना सेवाग्राम सावंगी नागपूर येथे नेण्याची वेळ पडत आहे.त्यामुळे त्यांना ताबडतोब योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्यांचे प्राण जात आहे .आज पर्यंत हिंगणघाट तालुक्याचा लोकांवर होत असलेला हा अन्याय केव्हा पर्यंत सहन करायचा असा प्रश्न पडला आहे.निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी ह्या सर्व समस्या सरकार दरबारी पाठपुरावा करून योग्य प्रकारे मांडल्यास ह्या सर्व समस्येचं निराकरण होऊ शकते पण अस कुठेच होताना दिसत नाही आहे त्यामुळे आज प्रत्येक गोष्टी साठी आंदोलन करण्याची वेळ येथील समाजसेवक आणि विरोधी पक्ष नेत्यांवर येत आहे. या नग्न आंदोलनात मेडिकल कॉलेज संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर, कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, सह कार्याध्यक्ष जगदीश वांदिले, त्याचबरोबर समितीचे प्रमुख नेते माजी आमदार राजूभाऊ तिमांडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुलभाऊ वांदीले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू खूपसरे, माजी नगरसेवक सतीश भाऊ धोबे, माजी नगसेवक अनिल भोंगाडे, माजी नगरसेवक दशरथ ठाकरे, सुरेंद्र टेंभूर्णे, सुरेंद्र बोरकर, समाजसेवक श्याम इडपवार, अक्षय बेलेकर, अमोल बोरकर, प्रशांत लोणकर, अजय पर्बत, सुनील ठाकरे, रुपेश काटकर, शुभम गोटे,अनिल भुते, राजू मुडे, सुशील घोडे, सुनील हरबुडे, सुधाकर बंगाले, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार बंधू, समाजसेवक, शिक्षक, युवक, विद्यार्थी आणि हिंगणघाट चे जागरूक नागरिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. September 10, 2023
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणारे महाशिबिर यशस्वी करावे – पालकमंत्री दादाजी भुसे August 22, 2024
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणारे महाशिबिर यशस्वी करावे – पालकमंत्री दादाजी भुसे August 22, 2024