भारत न्यूज 1 नाशिक
प्लास्टर ऑफ पॉरिस (POP) च्या ऐवजी पर्यावरण पुरक मुर्ती बनविण्यासाठी विविध पर्यायांचे प्रात्याक्षिक (DEMO) मूर्तिकार,सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी आणि पर्यावरण प्रेमींनी उपस्थित रहाण्याचे जाहिर आवाहन डॉ.विजयकुमार मुंडे. पर्यावरण,उपायुक्त,मनपाने केले आहेत.
नाशिक महानगरपालिका, नाशिक कार्यक्षेत्रात पर्यावरण विषयक कामकाज करण्यात येत आहे. सालाबाद प्रमाणे दरवर्षी मनपा हददीत मुर्तीकार प्लास्टर ऑफ पॉरिसच्या (POP) मुर्ती बनवुन मुर्तींची विक्री करतात. प्लास्टर ऑफ पॉरिस (POP) च्या मुर्तींमुळे पर्यावरणास हानी पोहोचते. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विविध सण साजरे करतांना POP मुर्त्या विसर्जन केल्यामुळे पर्यावरणाची मोठी हाणी होऊ नये म्हणुन POP मुर्त्यांवर पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे. या अनुषंगाने केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करुन येणाऱ्या काळातील बरेचसे सण, उत्सव प्रदुषण मुक्त पध्दतीने साजरे करण्याच्या दृष्टीने आता पासुनच नियोजन करणेकामी प्रदुषण मुक्त व पर्यावरण पुरक पध्दतीने साजरे होतील यासाठी नाशिक महानगरपालिकेकडुन POP मुर्ती ऐवजी पर्यावरण पुरक मुर्ती बनविण्यासाठी आपणाकडे कुठला नैसर्गिक पर्याय आहे. याची सर्वांना माहिती मिळावी व येणाऱ्या उत्सवात त्याचा वापर होण्याकरिता दि.23/02/2024 रोजी दुपारी 3.00 वाजता महात्मा फुले कलादालन येथे मुर्तिकार व स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक मंडळ यांचेकरीता पर्यावरण पुरक उत्सव, सण साजरा करणेकरिता POP मुर्ती एैवजी इतर पर्यावरण पुरक पर्यांयांचे प्रात्यक्षिक (DEMO) सादर करणेत येणार आहे. हे प्रात्यक्षिक पाहणेसाठी मुर्तिकार व स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक मंडळ यांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहवे असे आवाहन डॉ.विजयकुमार मुंडे, उपआयुक्त (पर्यावरण) यांनी केले आहे.