Search
Close this search box.

नाशिक तपोवनातील बटुक हनुमान मंदिरात चैतन्य उत्सव

भारत न्यूज 1 नाशिक 

श्री गोपीनाथ गौडीय मठद्वारा कार्यक्रमाचे आयोजन

 

समस्त गौड़ीय वैष्णव संप्रदायचे (परंपरेचे) संस्थापक आचार्य पूज्य श्रील प्रभुपाद भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी ठाकुर यांची १५० वी जयंती आणि पूज्य श्री भक्ति प्रमोदपुरी गोस्वामी ठाकुर यांची १२५ व्या जयंती उत्सवचे त्रयवार्षिक आयोजन समस्त विश्व भर होत आहे. याचा एक भाग नासिक येथिल तपोवनातील प्राचीन बटुक हनुमान मंदिरात रविवारी (दि.१७) सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. यानिमित्ताने नाशिक मधील प्रमुख साधू, संत व महंत यांची उपस्थिती राहणार असल्याचे श्री गोपीनाथ गौड़ीय मठाचे सदानंद दास यांनी सांगितले.

शांती, प्रेम आणि आनंद यांचा त्रिवेणी संगम या चैतन्य उत्सवात अनुभवायला मिळणार आहे. श्री कृष्ण चैतन्य महाप्रभु यांच्या शुद्ध भक्ति प्रचाराच्या कार्यातील अग्रसर, श्रील भक्ति विबुध बोधायन गोस्वामी महाराज, आचार्य – श्री गोपीनाथ गौड़ीय मठ यांचा अध्यक्षतेने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम रविवारी (दि.१७) सायंकाळी ५ ते ८ पर्यंत नासिक मधील श्रेष्ठ वैष्णव साधू, संत आणि महंत यांच्या सानिध्यात तपोवनातील बटुक हनुमान मंदिरात होणार आहे. यावेळी उपस्थित साधूंचे मार्गदर्शन, हरिनाम यज्ञ अर्थात हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन होणार आहे. यावेळी उपस्थित भाविकांना भोजन महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सदानंद दास यांनी दिली.

Bharat News1
Author: Bharat News1

भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।

वेब पोर्टल चैनल:- https://bhartnews1.com
यूट्यूब चैनल:- https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
व्हाट्सएप चैनल :- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like

Read More