Search
Close this search box.

बोदवड उपसा सिंचन चा मार्ग मोकळा- 563 कोटींचा निधी मिळणार

भारत न्यूज 1 बुलढाणा

*खासदार प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश *

बुलढाणा जिल्ह्यातील 13743 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजनेअंतर्गत समावेश…

 

सिंचन व्यवस्थित झाल्याशिवाय शेतीला चांगले दिवस येणे अशक्य आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लोकसभेमध्ये सातत्याने पाठपुरावा करत असतात.बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा व मलकापूर या कायम आवर्षणग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने योजनेला मूर्त रूप देण्याच्या दृष्टीने मान्यता दिली आहे.*

खासदार प्रतापराव जाधव यांनी यासंदर्भामध्ये वारंवार पाठपुरावा केला. तद्वतच लोकसभेमध्ये हे प्रश्न देखील लावून धरले. मोताळा व मलकापूर तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसाठी बोदवड उपसा सिंचन योजना किती महत्त्वाची आहे, या संदर्भामध्ये केंद्र सरकारला जाणीव करून त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला.

प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजनेअंतर्गत बोदवड उपसा सिंचन योजनेचा समावेश झाल्याने तब्बल 536 कोटी रुपयांचा निधी त्या अंतर्गत मिळणार असून खासदार प्रतापराव जाधव यांच्या मागणीमुळे शेतकऱ्यांचा हा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.
केंद्र शासनाच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या बैठकीत तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या बोदवड परिसर सिंचन योजना टप्पा एकचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजना अंतर्गत वेगवर्धित सिंचन योजनेत करण्याला मान्यता प्राप्त झाली आहे. टप्पा एकची एकूण किंमत 2141.19 कोटी रुपये असून त्या कामाप्रीत्यर्थ किंमत 1923.81 कोटी रुपये एवढी आहे.

विदर्भातील 6167 हेक्टर व अवर्षण प्रवण भागातील 9507 तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील 6546 हेक्टर अशा बुलढाणा जिल्ह्यातील 13743 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा यातून मिळणार आहे.मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार 536.64 कुठे येत्या तीन वर्षात केंद्र शासनामार्फत प्राप्त होणार असून उर्वरित 543.35 कोटी राज्य शासनामार्फत खर्च करण्यात येणार आहेत.

बोदवड उपसा सिंचन योजनेचा मुख्य स्रोत हातनुर धरण आहे. कायम अवर्षणग्रस्त असणाऱ्या मोताळा व मलकापूर तालुक्यासाठी ही उपसा सिंचन योजना वरदान ठरणार आहे खासदार प्रतापराव जाधव यांनी कायमस्वरूपी या भागातील शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्था व्हावी म्हणून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन संसदेच्या 2022 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी मध्ये बोदवड उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात Grants For Demands च्या अनुषंगाने आग्रही भूमिका देखील खासदार प्रतापराव जाधव यांनी मांडली होती.

Bharat News1
Author: Bharat News1

भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।

वेब पोर्टल चैनल:- https://bhartnews1.com
यूट्यूब चैनल:- https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
व्हाट्सएप चैनल :- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like

Read More