भारत न्यूज1 नाशिक
नाशिक महानगरपालिकेचे वतीने माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस तसेच सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवसानिमित्त इंदिरा गांधी चौक शालीमार येथील श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे श्रीमती इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस मा. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शपथ घेण्यात आली. या दोन्ही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमास उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंडे,श्रीकांत पवार,अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण,शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी बी.टी.पाटील, कार्यकारी अभियंता धारणकर, अधीक्षक रमेश बहिरम,सहाय्यक अधीक्षक शेखर चौरे,सुरक्षा अधिकारी टी शिंदे,सहाय्यक नगर सचिव किशोर कोठावळे, अतिरिक्त आयुक्त यांचे स्वीय सचिव कैलास दराडे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,नितीन गंभीरे संतोष कान्हे,हुसेन पठाण,सागर पीठे, वीरसिंग कामे, जयश्री बैरागी,जयश्री गांगुर्डे,सोनल पवार,वक्ते,शिंदे, सुमन गवळी,ललिता गुंजाळ,छाया चारोस्कर,विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय बागुल,उद्यान निरीक्षक वसंत ढुमसे,किरण बोडके, नानासाहेब पठाडे, सुनील नारायणे, राजू गायकवाड आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
शहर अध्यक्ष ॲड आकाश छाजेड, माजी नगरसेविका डॉ हेमलता पाटील , माजी नगरसेवक राजेंद्र बागुल,युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल पाटील, महिला अध्यक्ष स्वाती जाधव, देवराम सौंदाने ,शरद बोडके, कुसुम चव्हाण, उषा साळवे, अजिंक्य मोरकर, पवन आहेर, ओमकार पवार, आदिनाथ नागरगोजे, अनिल बोहोत, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे आदी उपस्थित होते.