Search
Close this search box.

मेरी माटी मेरा देश अभियान अमृत कलशयात्रेच्या बसला हिरवा झेंडा

भारत न्यूज 1 नाशिक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त देशात माझी माती माझा देश या अभियाना अंतर्गत नाशिक महानगरपालिके सह जिल्ह्यातील एकूण १८ अमृतकलश आज दिल्ली येथील मुख्य कार्यक्रमासाठी रवाना करण्यात आले.या अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्याचा अमृत कलश हा जिल्हास्तरावर आणण्यात येऊन नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने महाकवी कालिदास कला मंदिर येथे कार्यक्रम घेण्यात आला होता.या कार्यक्रमात संकलित अमृत कलश हे २७ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात ठेवण्यात येणार आहेत. नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांचा सहभाग या कार्यक्रमात आहे.

*भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।*

*वेब पोर्टल चैनल:-* http://www.bhartnews1.com
*यूट्यूब चैनल:-* https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
*व्हाट्सएप चैनल :-* https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.अशोक करंजकर,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल यांनी मेरी माटी मेरा देश अभियान यात्रेच्या बसला हिरवा झेंडा देऊन या नाशिक मुंबई दिल्ली अमृत कलश यात्रेचा शुभारंभ केला. या अभियानाचे समन्वयक मनपा उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ,उपजिल्हाधिकारी झिरवाळ, जिल्हा सह आयुक्त श्याम गोसावी ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे,मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.सर्वच विभागातील अधिकारी यांनी अभियानात सहभागी झालेल्या स्वयंसेवकाना मुंबई व दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाकरिता शुभेच्छा दिल्या.
नाशिक जिल्ह्य़ातील नाशिक व मालेगाव महानगर पालिकेचे २ तसेच १६ नगर परिषदांच्या १ त्याच प्रमाणे जिल्ह्य़ातील सर्व १५ तालुक्यातील १ याप्रमाणे एकूण १८ अमृत कलश मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रत सहभाग घेतील. मुख्यमंत्री व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत २७ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर सकाळी कार्यक्रम होणार असून महाराष्ट्रातील सर्व अमृत कलश सायंकाळी दिल्लीकडे रवाना होणार आहेत.दिल्ली येथे अमृत वाटिकाचा मुख्य कार्यक्रम कर्तव्य पथ येथे ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.यामध्ये नाशिक मधील ३६ युवक सहभागी होणार आहेत.नाशिक महानगरपालिकेच्या वतीने प्राध्यापक ज्येष्ठ कलावंत प्रथमेश जाधव आणि इंजिनिअर नितीन रायते यांची या यात्रेसाठी निवड करण्यात आली आहे.

1

Bharat News1
Author: Bharat News1

भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।

वेब पोर्टल चैनल:- https://bhartnews1.com
यूट्यूब चैनल:- https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
व्हाट्सएप चैनल :- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like

Read More