भारत न्यूज 1 संपादक देवराज सोनी
जिल्हा परिषद नाशिक व आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यामध्ये प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमांतर्गत सर्व तालुक्यामधून 300 प्रशिक्षणार्थी ची निवड करण्यात आली होती व त्यांना मार्च महिन्यामध्ये जिल्हास्तरावर या कार्यक्रमाबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले त्यानंतर या 300 प्रशिक्षणार्थींनी आपला कार्यक्षेत्रामध्ये जाऊन घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक करत होते त्यामध्ये प्रत्येक प्रशिक्षणार्थीने प्रत्येकी दस केसेस दत्तक घेतले होते व त्यांच्या सखोल अभ्यास करत होते या तीनशे प्रशिक्षणार्थी पैकी अंतिम परीक्षा मधून 59 मेंटर व 30 फॅसिलिटर ची निवड करण्यात आली आहे. मेंटर व फॅसिलिटर यापुढे जिल्ह्यातील सर्व आरोग्य विभाग व आयसीडीएस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत स्तनपानासाठी क्रॉस क्रेडल होल्ड या पद्धतीने स्तनपान करण्यावर भर देण्यात आल्या असून त्याच बरोबर प्रभावी लेन्चिंग, स्तनपान करताना सुरुवातीचे संकेत कसे ओळखावे,गरोदर मातेने गरोदरपणात घ्यावयाच्या पोषण आहार व बाळाच्या सहा महिने वयानंतर सुरू करण्यात येणाऱ्या पूरक आहारावर विशेष भर देण्यात आला आहे.
सद्यस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यात झिरो ते पाच वर्ष वयोगटातील एकूण बालकांची संख्या 309718 असून त्यापैकी 423 बालके SAM तर 2174 बालके MAM या कुपोषण श्रेणी मध्ये आहेत सदर कार्यक्रमामुळे हे कुपोषण कमी होण्यासाठी मदत मिळणार आहे.
भारत न्यूज 1 चैनल ला सबस्क्राइब करा आणी शेयर करा वेब चैनल. :- https://bharatnews1.com युट्यूब चैनल :- https://www.youtube.com/@BharatNews1-23 टेलीग्राम चैनल :- https://t.me/bharatnews1newschannel वॉट्सअप चैनल:- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत सदर कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमाचे सुयोग्यरीत्या सनियंत्रण करण्यासाठी Cuedwll Application याच्या वापर करण्यात येणार असून हे एप्लीकेशन मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या वापर करण्यात आला आहे सदर एप्लीकेशन हे अंग्रेजी हिंदी व मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे या सोबतच जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये ” प्रभावी स्तनपान फेरी ” व ” डिस्चार्ज क्रायटेरिया ” या दोन उपक्रम सुद्धा प्रभावीपणे राबवण्यात येत आहे यामुळे बाळाला जन्माच्या नंतर एक तासाच्या आतच स्तनपान सुरू करणे व प्रसुती झालेल्या मातांना प्रभावी स्तनपान बाबत योग्य मार्गदर्शन करण्यात येते या उपक्रमामुळे बाळाचे वजन वाढीसाठी मदत होणार आहे सदर कार्यक्रम नाशिक जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असून सनियंत्रण दीपक चाटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल अतिरेक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षल नेते जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर दीपक लोणे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर युवराज देवरे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षल कुमार महाजन तालुका आरोग्य अधिकारी बागलाण यांचे मार्फत करण्यात येत आहे.