भारत न्यूज 1 जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगर
आसमानी संकट , गुरांना लंम्पी आजाराची साथ, लष्करी अळीने मका पिके फस्त
पिकाचा जीव गेला आणि पाऊस आला उत्पन्नाची हमी नसल्याने बळीराजा हैराण
कन्नड तालुक्यातील नाचनवेल, पिशोर, चिंचोली लिंबाची परिसरातील शेतकऱ्यावर एका नंतर एक तेरी संकट आणि शेतकरी मात्र हवालदिलं झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे . पावसाअभावी सुरुवातीला अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पावसाचा खंड पडल्याने सर्वच पिकांनी माना टाकल्या होत्या अनेक शेतकऱ्यांची पिके वाळल्यात जमा झाली होती . याची कृषी विभाग व तहसीलदार कन्नड यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी देखील केली होती. काही दिवसापूर्वी झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे सर्वच पिकांना जीवदान मिळाली मात्र या पिकांनवर लष्करी अळीने थैमान घातले आहे . पिशोर येथील विजय जाधव यांनी आपल्या गट नंबर 246 मध्ये एक एकर क्षेत्रावर शेडनेटमध्ये झेंडूच्या फुलांची शेती केली त्या झेंडूंना फुले देखील बहरली होती परंतु अचानक दोन दिवसात लष्करी अळीने अटॅक केला 24 तासात संपूर्ण झेंडूची शेती या लष्कराळीने फस्त करून टाकली त्यामुळे शेतकऱ्याने या झेंडूच्या शेतीच्या पिकावर रोट्या फिरविला एवढेच नाही तर मका पिकांवर देखील मोठ्या प्रमाणावर या आळीने थैमान घातले असून शंभर टक्के मकाचे पीक नेस्तनाबूत करून टाकले आहे एका दांड्यावर किमान पाच ते सहा अळी आढळून येत आहे नियंत्रणासाठी अनेक फवारण्या करूनही याचा काहीही उपयोग होत नाही यामुळे कृषी विभागाने वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात काही महिन्यांपासून दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गुरांवर देखील लंम्पी आजाराची लागण दिवसेंदिवस वाढत चालल्याने गावोगावी आत्तापर्यंत अनेक लाख दीड लाख रुपये किमतीचे जनावरांचा मृत्यु झाला आहे . पशुधन विकास अधिकारी डॉक्टर यांचे अतोनात प्रयत्न सुरू असून जनजागृती देखील करत आहे त्यामुळे काही प्रमाणात या आजारावर नियंत्रण होत आहे. अशा एका नंतर एक तिहेरी संकटांनी शेतकरी मात्र अतिशय नेटाखुटीला आले असून हवालदील झाला आहे. प्रशासनाने या विषयांकडे लक्ष देऊन शासन शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदत व दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता सर्व शेतकरी करत आहे.