होरायझन अकॅडमी ICSE येथील विद्यार्थ्यांना सशस्त्र दलातील करिअर मार्गदर्शन
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या होरायझन अकॅडमी ICSE ने सोमवार, ११ सप्टेंबर २०२३ रोजी इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सशस्त्र दलातील करिअर मार्गदर्शन विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानात उपस्थित विद्यार्थीना लश्कर मधे ओफिसर कसे बनता येनार याची सविस्तर माहिती व्हिडिओ प्रेजेंटेशन द्वारा देण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदलाच्या क्षेत्रातील प्रख्यात तज्ञ व उर्जा अकादमीचे संस्थापक अनिरुद्ध तेलंग , निवृत्त कॅप्टन शशांक जोशी, अनुभवी सागरी अभियंता आणि वायुसेनेचे प्राध्यापक ग्रुप कॅप्टन राव, यांच्यासोबत भारत न्यूज 1 चॅनेल चे मुख्य संपादक देवराज सोनी हे उपस्थित होते.
वक्त्यांच्या आपापल्या क्षेत्रातील त्यांचे अनुभव जाणून विद्यार्थी मंत्रमुग्ध आणि प्रेरित झाले. विद्यार्थ्यांसाठी हे व्यासपीठ मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॕडव्होकेट.नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी बी.डी.पाटील आणि शाळेच्या प्राचार्य डॉ.निधी मिश्रा यांनी उपलब्ध करून दिल्या मुळे विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांचे व्यावसायिक करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन मिळेल.