भारत न्यूज 1 नांदेड जिल्ह्या प्रतिनिधी
नायगाव तालुक्यात कडकडीत बंद
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटा गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमारच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड जिल्हा बंद करण्यात आला. त्या बंद मध्ये नायगांव तालुका व शहर बंद मध्ये मराठा समाज बांधवाने शांततेत बंद यशस्वी करावा आणि निषेध नोंदवावा यासाठी समाज बांधवाना अनेकांनी मार्गदर्शन करताना सांगितले या मुळे हा बंद शांततेत संपन्न झाला.नायगाव कुंटुर,शंकरनगर पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त चौका चौकात लावला होता.
नायगाव तालुक्यात जालना जिल्ह्यात घडलेल्या दूरघटनेचे पडसाद ग्रामीण भागात ही पोहचल्याचे चित्र दिसले तालुक्यातील नरसी,गडगा मांजरम,कोलंबी, कहाळा,बरबडा,घुंगराळा,कुंटुर,राहेर,देगाव, परिसरात व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने सकल मराठा समाज बांधवांच्या आव्हाणाला प्रतिसाद देत कडेकोट बंद ठेवली होती.
ग्रामीण भागात बऱ्याच प्रमाणात शाळा,कनिष्ठ विदयलय, चालू होती तर गोदमगाव येथे सकल मराठा समाज आंदोलन कर्त्यांनी शाळा बंद करण्याचे आवाहन केल्या नंतर शाळा बंद करण्यात आली.शहरात मात्र विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन कर्मचारी श्रावण सोमवार निमित्त अर्धवेळ हजर राहून शाळा केली होती.
नायगाव चे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, नरसी येथे स.पो.नि. दिघे व कुंटुरचे स.पो.नि. बहात्तरे यांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व चौकाची ठिकाणी व गर्दीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावला होता.तर श्रावण सोमवार निमित्त भक्त गण व शाळा,कार्यालय, विद्यालय कर्मचारी यांची मात्र एस. टी.व काही वाहन बंद असल्याने मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. जालना येथील मराठा बांधवांच्या मोर्चा वरती पोलिसांनी अमानुष लाठी हला केला व गोळीबार केल्याप्रकरणी नायगाव तालुका शिवसेनेच्या वतीने डाँ.हेडगेवार चौकात पो.नि.चिंचोलकर यांना निवेदन देत जाहीर पाठिंबा व सरकारच्या विरोधात जाहीर निषेध करण्यात आला.
नायगाव तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे जालना जिल्ह्यातील मराठा बांधवांच्या मोर्चा वरती पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज करून महिला मुलं बाळ ज्येष्ठ मंडळी यांची डोके फोडली त्यांच्यावर गोळीबार केला गोळीबार करण्याचा आदेश देणाऱ्या सरकारच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. व मराठा बांधवांचा जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटा येथील आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करीत असलेल्या सर्व मराठा बांधवांना जाहीर पाठिंबा घोषीत करण्यात आला आहे.
समस्त युवा सेना तालुका नायगाव यांच्या वतीने सदर आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला असून सरकारच्या विरोधात रोष निर्माण करून त्यांच्याविरुद्ध जाहीर निषेधही करण्यात आला आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका युवासेना तालुकाप्रमुख शिवाजी ईबितदार कुंटूरकर,मारोती पा.भागानगरे,केरबा पा.वडजे, नारायण पा.उपासे,राजेश पा.शिंदे व इतर सर्व सकल मराठा समाज आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी सहित निवेदन देण्यात आले आहे.