*पिशोर येथे आदर्श पतसंस्थेच्या शाखा ठेवीदारांनी घातला घेरा
मानकापेला ओळखत नाही अशी म्हणून धरले धारेवर
आदर्श पतसंस्थेचे संस्थापक अंबादास मानकापे यांनी आदर्श पतसंस्थेमध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला चार-पाच महिन्यापासून ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आतापर्यंत सात-आठ ठेवीदारांना जीव गमावा लागला आदर्श महिला नागरी बँक व पतसंस्थेत ठेवीदारांनी मोलमजुरी करून शेळ्या मेंढ्या मिळून रक्ताचे पाणी करून वन वन फिरून एक एक रुपया जमा करून मुलांच्या शिक्षणासाठी मुलीच्या लग्नासाठी म्हातारपणासाठी पैसे जमा करून ठेवले या ठेवीदारांची मानकापेने मानस कापली आदर्श महिला नागरी बँकेवर प्रशासक बसवले परंतु अजूनही पाहिजे तशी कामाला गती मिळाली नाही असे दिसत असल्याने पिशोर व परिसरातील आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांनी खातेदारांनी सकाळी सकाळी पिशोर येथील आदर्श पतसंस्थेवर जाऊन शाखा व्यवस्थापक तातेराव नारायण माडेकर यांना घेराव घालीत जॉब विचारला की तुम्ही आमचे पैसे कधी देणार तुम्ही सांगत होते मी आहे माझ्यावर भरोसावर पैसे ठेवा आता आम्हाला आमचे पैसे पाहिजे काही जणांनी माडेकर ला विचारले की तुमच्याकडे एवढी मालमत्ता कुठून आली असे विचारत शाखा व्यवस्थापकाला धारेवर धरले त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ठेवीदारांनी सांगितले की मुख्यमंत्री म्हणतात की शासन तुमच्या दारी मन शासन आमच्या दारी तर आता का तुम्ही झोपले आता आम्ही दारी आणि तुम्ही घरी असे म्हणत तीर्व संताप व्यक्त केला संबंधित विभागाच्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे हा घोटाळा झाला पहिले या ऑडिटर कर्मचाऱ्यावर शासन व्हायला पाहिजे जनतेचे सरकार म्हणणारे मुख्यमंत्री शिंदे साहेब जर खरंच जनतेचे सरकार असेल तर या प्रकरणात लक्ष घालून ठेविधानाचे खातेदाराचे पैसे कसे मिळणार लवकरात लवकर प्रशासनाच्या कामाची गती वाढवून स्वयंघोषित सहकार रत्न म्हणणारा अंबादास मानकापे व संबंधित संचालक मंडळ यांच्या मालमत्ता जप्त करून ठेविदाराचे पैसे लवकरात लवकर द्यावी व फरार असलेला आधाने यास गजाआड करावी असे आदेश द्यावे ठेवेदारांचा अंत बघू नये अजून किती जणांचा जीव घेणार असे बोलताना सांगितले…