भारत न्यूज 1 नाशिक
नाशिक महानगरपालिकाक्षेत्रात आयुष्यमान आरोग्य मंदिरचा लोकार्पण सोहळा दि.१२ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री,भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते आयुष्यमान आरोग्य मंदिर,वडजेनगर,आकाश पेट्रोल पंपामागे,दिंडोरीरोड,पंचवटी,नाशिक येथे मुख्य कार्यक्रम पार पडला.
लोकार्पण सोहळ्याचे श्रीमती भारती पवार यांनी दीपप्रज्वलन करून आरोग्य केंद्राचे फित कापून उद्घाटन केले व केंद्राची पाहणी केली.त्यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर,अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ तानाजी चव्हाण यांनी केले.आज शहरात एकूण ४६ आयुष्मान आरोग्य मंदिरचे लोकार्पण डिजीटल ऑनलाइन पद्धतीने ना.पवार यांच्याहस्ते पार पडले. या लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण नाशिक महानगरपालिकेच्या सहाही विभागीय कार्यलयात एलईडी स्क्रिनवर दाखविण्यात आले.ऑनलाइन कार्यक्रमास शहरातील लोकप्रतिनिधी, नाशिककर उपस्थित होते.
नागरी भागात वैद्यकीय सेवा भक्कम करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने महापालिका क्षेत्रात आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे.केंद्रशासनाने १५ वा वित्त आयोगांतर्गत प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम २०२१-२२ ते २०२५-२६ या ५ वर्षाच्या कालावधीत राबविले जाणार आहे. नाशिक महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगातून १०६ आयुष्यमान आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे.त्यापैकी ४६ आयुष्मान आरोग्य केंद्राचे काम पहिल्या टप्यात पूर्ण करण्यात आले. या सर्वांचा लोकार्पण सोहळा आज पार पडला.या आरोग्य केंद्रात १ एमबीबीएस डॉक्टर,१ स्टाफ नर्स,१ बहुद्देशीय सेवक व १ सहाय्यक अशी नियुक्ती केली जाणार आहे.या आरोग्य मंदिर यांची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी राहणार आहे.आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून हायपर टेन्शन,रक्तदाब,मधुमेह आदी आजारांवर उपचार केले जाणार आहे. माता व बाल आरोग्य तपासणी या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून होईल।
या लोकार्पण सोहळ्यास मा.ना.श्रीमती.भारती पवार,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री,भारत सरकार,मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर,अतिरिक्त आयुक्त (सेवा)स्मिता झगडे,अतिरिक्त आयुक्त्त (शहर)प्रदीप चौधरी,उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंडे,श्रीकांत पवार,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण,शहर अभियंता शिवकुमार वंजारी,अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल,कार्यकारी अभियंता संदेश शिंदे,सहा.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अजिता साळुंखे,डॉ.प्रशांत शेटे,डॉ.नितीन रावते,,जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय देवकर, आदीसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.आयुष्यमान आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले.आभार प्रदर्शन डॉ.अजिता साळुंखे यांनी केले.