भारत न्यूज 1 नाशिक (प्रतिनिधी)
विशेष ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर : संत महंत व आखाडा प्रमुखांच्या उपस्थितीत झाली महाआरती
नाशिक गोदावरी नदीच्या रामकुंडावरील गोदा आरतीची परंपरा ही सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्याआधीपासून म्हणजे कित्येक शतके, वर्षे जुने जुनी परंपरा ही कायम असून तिला कोणतीही बाधा येऊ नये केवळ समितीच्या माध्यमातून जर गोदा आरतीला अडथळे येत असतील तर त्याला विरोध केला जाईल, गोदांचा गोदा आरतीचा अधिकार हा पुरोहित संघालाच असून याकरिता ५००हून अधिक मंदिरे, मठ, आखाडे यांच्या प्रमुखांनी आरतीचा अधिकार पूरोहित संघालाच असावा यासाठी समर्थन देणारा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर केला. त्यानंतर उपस्थित सर्व पुरोहित संघाचे साधु,संत, महंत व पंचवटीवासीय तसेच नाशिककर यांच्याउपस्थित वतीने रामकुंड येथे महाआरती करण्यात आली.
काल सायंकाळी लेवा पाटीदार कार्यालय, पंचवटी येथे समस्त साधू, संत, समाज, सार्वजनिक मित्र मंडळे, सकल हिंदू समाज, शिवजन्मोत्सव समिती यांनी प्रस्तावित गोदावरी महाआरती निमित्त विचार विनिमय करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी दिगंबर आखाड्याचे महंत किशोरदास महाराज शास्त्री होते. जय श्रीराम, गोदावरी माता की, भारत माता की जय आदी जयघोष करीत शामध्ये वेद मंत्रोच्चारात प्रभू श्रीरामचंद्रांचा जय जय कार करीत गंगा गंगा गोदावरीचे नामस्मरण करीत ग्रामसभेला सुरुवात झाली.
प्रारंभी उपस्थित संत मानतांचा मान्यवरांच्या हस्ते पहा अर्पण करून सत्कार करण्यात आला. गोदावरी पुरोहित संघ शतकानुशतके आरती करीत आहे. आता शासनाची दिशाभूल करून समिती तयार केली गेली, अतिशय छोट्या वृत्तपत्रात जाहिरात देऊन मोजकेच अंक प्रकाशित करीत निर्माण केलेला समितीचा काहीही संबंध नाही ही समिती बेकायदेशीर असून त्यासंदर्भात शासनाला अहवाल पाठवल्याचे महंत सुधीरदास महाराजांनी सांगितले. पुरोहित संघाचे महत्व आणि परंपरा नाकारता येणार नाही. आणि ह्या अति प्राचीन परंपरेला छेद देणारे कोणी कृत्य केल्यास त्यांना त्याच भाषेत कडाडून विरोध केला जाईल असेही त्यांनी सांगितले.
पूरोहित संघातर्फे रामकुंडावरील गोदावरीची आरती ही अनेक काळापासून चालू आहे, त्यात कोणताही खंड नाही, मात्र शासनाने काही कोटी रुपये यासाठी मंजूर केले आणि अनेकजण या कामाला लागले. ज्यांचा काही संबंध नाही ते लोक आता आमच्या घरात येऊनच गोंधळ घालण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्याला विरोध केला जाईल असे सचिन डोंगरे म्हणाले.
गुरु पूर्वी संघापासून वर्षे गोदावरी येथे महादजी करीत आहे. शासनाने महा आरती करताय मंजूर केले मात्र त्याकरताच नेमलेल्या समितीला मान्यता नाही. हा शासनाचा निधी गोदावरी सुशोभीकरण करिता असून समितीचा काहीही अधिकार नाही हे करताना नाशिकची व पुरोहित संघाची परंपरा कायम रहावी याकरिता पंचवटीकरांचे समर्थन असल्याचे माजी आमदार व व या विषयाकरिता विशेष ग्रामसभा बोलविलेले प्रमुख बाळासाहेब सानप यांनी मत व्यक्त केले.
महाआरतीचा माना पुरोहित संघालाच असून तो हिरावण्याचा प्रयत्न केला जाऊ नये वर्षांवरचे परंपरा जपली जावी याकरिता स्थानिक साधुसंतांचा सहभाग असलेली समिती स्थापन करून ही जुनी परंपरा अधिक जोमाने व चांगली केली जावी असे मत भक्तीचरणदास महाराज त्यांनी व्यक्त केले.
महाआरती करिता स्वतंत्र समिती स्थापन करण्यापेक्षा एकत्र येऊन काम केले असते तर अधिक चांगले झाले असते त्याकरता वेगळी समिती करण्याची गरज नसल्यास चे मत सुनील बागुल यांनी व्यक्त केले. पुरोहित संघाला डावलून स्वतंत्र समितीद्वारे आरतीचा प्रयत्न झाला तर त्याला विरोध केला जाईल असे स्वामी रामतीर्थमहाराज यांनी सांगितले.
त्यानंतर ज्ञानेश्वर बोडके गजू घोडके त्र्यंबकेश्वर चे मनोज थेटे, कल्पना पांडे, स्वामी नारायण (बीएपीएस) मंदिराचे महंत महाव्रत स्वामी महाराज, बबलूसिंह हुंडल पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत चरणदास महाराज, पंचायती आखाडा श्री निरंजनीचे राष्ट्रसंत अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, सुनील बागुल, सतीश शुक्ल आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
पंचवटीतील पाटीदार उगवण्याची ग्रामसभेचे प्रास्ताविक चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी तर सूत्रसंचालन दिगंबर धुमाळ यांनी केले.
या ग्रामसभेसाठी हर्षद पटेल, शैलेश सूर्यवंशी, हरिभाऊ लासुरे, उपेंद्र देव सुहास शुक्ल, सतनाम सिंग राजपूत, नरहरी उगलमुगले, राहुल बर्वे, राजकमल जोशी, तुषार नाटकर, प्रकाश चव्हाण, राहुल बोडके, सुनील निरगुडे, अनिल वाघ, महेंद्र बडवे, मयुरेश पानसरे, प्रसन्न बेळे, हरे कृष्ण सानप, प्रसाद बोडके, गणेश कमरे, सागर पाटील, दुर्गेश वाघमारे, सोमनाथ मोरे, सुनील भोसले, अजय पाटील, काळू जाधव, हेमंत तळाजिया, महेंद्रा आव्हाड, अलोक गायधनी, राजेंद्र बैरागी, सागर चव्हाण, संदीप आवारे, योगेश ठोसरे, भगवान भोगे, ॲड. भानुदास शौचे, सदानंद देव, विवेक दीक्षित, श्रीपाद अकोलकर, मंगेश गवळी, स्मिता मुठे, निलेश गुंजाळ, गोविंद कुंटे, संजय जमदाडे, केशव मिसाळ, निखिल देव, शिवाजी देव, अतुल पंचभय्ये, हर्षद भागवत, चेतन कवरे, राजेंद्र वैद्य, गुलाब भोये, बाळासाहेब पाठक, राजाभाऊ बोराडे, उल्हास सातभाई, लक्ष्मण धोत्रे, रामसिंग बावरी, अंबादास रामलखनदास, संजय काळे, नंदू काळे, अमोल पंचाक्षरी, योगेश मांडवगणे, गोविंद गायकवाड, शुभम ढिकले, नितीन शेलार, सचिन ढिकले, उल्हास पंचाक्षरी, नवनाथ जाधव, हर्षद वाघ, राजेंद्र साळुंखे, संजय शिंदे, आकाश जाधव, विलास कौलगीकर, राहुल बागमार, लक्ष्मीकांत शिंदे, अमित खांदवे, चेतन कवरे, मनोज जाधव, बाळासाहेब राजवाडे, विशाल देशमुख, मंदार शिंगणे आदी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
ग्रामसभेत सर्वानुमते हात उंचावून ठरावाला मान्यता देण्यात आली
नाशिकमधून वाहणाऱ्या दक्षिणवाहिनी गोदावरी नदीची सेवा, आरती, नैवेद्य, नित्य दैनंदिन सेवा, गोदाजन्मोत्सव, धार्मिक कार्यक्रम अनादी कालापासून परंपरेने पुरोहित व पुरोहित संघ रामतीर्थावर करीत आले आहेत. तसेच नाशिक पुण्यनगरीत होणारा सिंहस्थ कुंभमेळा, धार्मिक उत्सव यात पुरोहित व पुरोहित संघाचा महत्त्वाचा सहभाग असतो. अनादी कालापासून दररोज सायंकाळी गोदातीर्थ पंचवटी, नाशिक येथे पुरोहित संघातर्फे गोदावरीची महाआरती करण्याची परंपरा आहे, त्यामुळे नाशिक येथील रामतीर्थावर केली जाणारी नित्य सायम आरतीचे नेतृत्व गोदावरी पंचकोठी (तीर्थ पुरोहित) संघ नाशिक यांच्याकडेच असावे आणि पुरोहित संघाने साधू, संतांचे आखाडे धार्मिक, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधिंना सोबत घेऊन दररोजच्या सायम आरतीचे आयोजन करावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
पुरोहित संघटना न विचारता स्थापन केलेल्या या समितीत सदस्यत्व दिलेले पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी या ग्रामसभेत सदस्य सदर समितीतून माघार घेत राजीनामा देत असल्याचे सांगितले.