भारत न्यूज 1 नाशिक संपादक देवराज सोनी
राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४ या कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांची उपस्थिती राहणार आहे.या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने विविध कामे हाती घेतली असून त्याची पाहणी प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी रामकुंड ते तपोवन परिसर व आदी भागांची पाहणी करून विविध कामांच्या सूचना दिल्या.
युवा महोत्सव २०२४ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात रंगरंगोटी करणे सजावट करणे आदी कामे महापालिकेच्या वतीने केली हाती घेतली आहे. रामकुंड व परिसराची स्वच्छता तसेच विविध मार्गांच्या सुशोभीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतलेले आहे.त्याची पाहणी महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी रामकुंड, सरदार चौक, राम मंदिर परिसर,जुना आडगाव नाका, औरंगाबाद नाका,तपोवन आदी भागांची पाहणी केली यावेळी त्यांनी विविध कामांच्या सूचना केल्या.
शहरातील चित्रकारांनी, वारली पेंटिंग,धार्मिक व रामायणातील विविध प्रसंग, शुभचिन्ह अशा विविध चित्रांनी तपोवन परिसर तसेच रामकुंड ते राम मंदिर सरदार चौक मार्गे राम मंदिर या भागातील विविध भिंतीवर आकर्षक चित्रे काढली. या चित्रकारांचे कौतुकमहापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी केले.
यावेळी महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्यासह उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर,श्रीकांत पवार,प्रशांत पाटील,शहर अभियंता शिवकुमार वंजारी,घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड,उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी बी. टी.पाटील,पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे,कार्यकारी अभियंता सचिन शिंदे,जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद नितीन गंभीरे आदी यावेळी उपस्थित होते.
*रामायणातील प्रसंग रेखाटले शहरातील कला शिक्षक चित्रकार*
रामकुंड ते राममंदिर पूर्व दरवाजा दरम्यान रामायणातील प्रसंग शुभ चिन्हे राजेंद्र लोखंडे,सचिन पगार, विनोद सोनवणे,संतोष मासाळ, सचिन अहिरे,कृष्णा जाधव, चित्रा संधान,जोत्सना पाटील,गजानन वाल,कश्मिरा सोनवणे,विलास गायकवाड,आरती मोरे,भावना आहेर, सुनीता शेटे,एस व्ही काळे अनिता गायकवाड,मालती काळे लीना राजनोर या विद्यार्थी व शिक्षकांनी रामायणातील विविध क्षण त्यांच्या कलेतून रेखाटले आहेत.