भारत न्यूज 1 नाशिक
राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४ अनुषंगाने नाशिक महानगरपालिकाच्या वतीने शहरात विशेष स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आले आहेत.
नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक १२ ते १६ जानेवारी २०२४ या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४ देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.या महोत्सवाच्या अनुशान्गाने शहरात विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविन्यास येत आहेत.
नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४ च्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका सर्व विभागीय कार्यालयांच्या क्षेत्रात असलेल्या सर्व सार्वजनिक ठिकाणी ,रस्ते,चौक ,मोकळे भूखंड ,क्रीडांगणे ,नाले व नदीकिनारे इत्यादी ठिकाणी दिनांक ५जाने. २०२४ ते दिनांक २६ जाने. २०२४ पावेतो दररोज विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना विभागप्रमुखांच्या बैठकीत दिल्या आहेत. तसेच याकामी शहरातील स्वयंसेवी संस्था ,NSS विद्यार्थी यांची मदत घेण्यात येत आहेत .
या बैठकीत दिलेल्या सूचनानुसार दिनांक ५ जाने. व ६ जाने. २०२४ या कालावधीत शहरात विविध ठिकाणी विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.अ.क्र विभागाचे नाव ठिकाण संकलित करण्यात आलेला कचरादिनांक ५/१/२०२४ दिनांक ६/१/२०२४
1. पंचवटी आडगाव नाका ,औरंगाबाद नाका ,मीनाताई ठाकरे स्टेडीयम सर्विस रोड,तपोवन साई मंदिर परिसर ,तपोवन नर्सरी रोड ०.६०० टन २.५०० टन
2. नाशिक रोड पुना रोड ,विहितगाव ,जय्यौद्दिन डेपो ,सिन्नर फाटा. ०.७५० टन ०.८७० टन
3. नाशिक पूर्व मुंबई नाका हायवे ,द्वारका ,दादासाहेब गायकवाड सभागृह ,लकी सोसायटी.मिरजकर नगर,काठेगल्ली सिग्नल ,नाशिक पुना रोड. २.००० टन ३.२५ टन
4. सातपूर सातपूर कॉलनी सर्कल ते पिंपळगाव बहुला मुख्य रस्ता,कार्बन नाका भाजी मार्केट ,आयटीआय सिग्नल परिसर ,महिंद्रा सर्कल ते मायको कंपनी ,एकांत सोसायटी ,बापू पूल १.६०० टन ०.९३० टन
5. नाशिक पश्चिम सिबल हॉटेल ते एबीबी सर्कल ,केबिटी सर्कल ते प्रसाद सर्कल ,पाटील परिचय गंगापूर नाका ,आकाशवाणी चौक ,शहीद सर्कल ,गडकरी चौक ते त्रंबक नाका १.३०० टन १.४०० टन
6. नवीन नाशिक पाथर्डी फाटा ,अंबड लिंक रोड ब्लू क्रॉस ,पेलिकन पार्क, आर.डी.सर्कल,मयूर हॉस्पिटल मागील परिसर औदुंबर पार्क ,नंदिनी नदी किनारा. १.५०० टन २.४०० टन
एकूण ६.७५० टन ११.३५ टन सदर मोहिमेकरिता शहरातील सर्व विभागनिहाय समन्वयक अधिकारी (नोडल अधिकारी) म्हणून मनपाच्या सर्व उपायुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच या अभियानात मनपाच्या बांधकाम विभागामार्फत शहरातील प्रमुख रस्त्यांचे दुभाजक आणि वाहतूक बेटं स्वच्छ करण्याची मोहीम देखील सुरू आहे. मनपा शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राष्ट्रीय युवा मोहोत्सव २०२४ च्या अनुषंगाने सुरू करण्यात आली आहे.