अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार उत्तरांचल यांचा विद्यमाने खारघर मुंबई येथे 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत 1008 कुंडाच्या भव्य अश्वमेघ महा यज्ञाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात तीर्थक्षेत्रे व धार्मिक ठिकाणे या ठिकाणी सदर मंगल कलश यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
28 ऑक्टोबर 2023 ना रोज संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथून सदर यात्रेचे भ्रमण सुरू करून नाशिक जिल्ह्यात दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी नांदगाव येथून नाशिक जिल्हात प्रवेश होणार आहे . मंगल कलश रथ यात्रा व दीपपूजन याचे आयोजन पुढील ठिकाणी करण्यात आलेले आहे ओंकारेश्वर महादेव मंदिर लासलगाव, उमिया माता मंदिर पिंपळगाव बसवंत, जगदंबा माता मंदिर कसबे वणी , सप्तशृंगी माता संस्थान वणी गड, स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी, नाशिक ग्रामदेवता श्री कालिका देवी मंदिर, श्री गायत्री माता मंदिर ओमकार चौक पाटील नगर सिडको नाशिक, श्री तीर्थक्षेत्र कुशावर्त त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र कपिलधारा कावनाई, श्री माहेश्वरी संस्थान इगतपुरी या सर्व ठिकाणी मंगल कलशरथ यात्रेचे व भव्य दीपनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी नाशिक शहरात भव्य कलश रथयात्रेचे मिरवणूक ग्रामदैवत श्री कालिका माता मंदिर येथून शुरू होऊन जुने सीबीएस, अशोक स्तंभ ,रविवार कारंजा ,पंचवटी कारंजा, मालवीय चौक, रामघाट असे राहील आपणास विनंती करण्यात येते की रामघाट येथे सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता सदर अश्वमेघ यज्ञ मंगल कलश रथयात्रेचे स्वागत व विधिवत पूजन मोठ्या प्रमाणात भाविकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे तर नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अश्वमेध यज्ञ आणि कळस यात्रेच्या लाभ घ्यावा.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गायत्री परिवार युग निर्माण योजना ट्रस्ट चे सर्व श्री विश्वस्त महिला मंडळ युवा मंडलाचे कार्यकर्ते अमृतभाई पटेल, मनीलाल पटेल, मीनानाथ सोनवणे, जयंतीभाई नाई, जय गोविंद पांडे, प्रेम सिंग ठाकूर, राकेश पटेल, रवींद्र कुमार शर्मा ,पुरुषोत्तम चोथानी ,दिनेश पटेल, सयाजी गांगुर्डे, गुलाब भाई रामावत, रवींद्र वाघ, किशोर व्यास, कांतीलाल पटेल, नर्मदा बेन पटेल, बबी बेन पटेल, सौ प्रतिभा नागरे, सौ स्वेताली राणे, सौ नयना बेन पटेल, सौ चंद्रिका बेन पटेल, सौ किरण चांडक, सौ भारती रोकडे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे.
https://bharatnews1.com/2023/12/20/एसटी-बसस्थानकांचा-एमआयडी/