Search
Close this search box.

नाशिक महानगरपालिका तर्फे सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावणेबाबत जाहिर आवाहन

भारत न्यूज 1 नाशिक

नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, वाणिज्यिक संस्था, हॉटेल्स इत्यादींना महानगरपालिकेतर्फे जाहिर आवाहन करण्यात येते, नामफलक मराठी भाषेत करणेत यावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल तरी सर्व दुकाने व आस्थापना यांनी आपले नामफलक तात्काळ मराठी देवनागरी भाषेत ठळकपणे प्रसिध्द करावेत असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर व उपआयुक्त (कर) श्रीकांत पवार महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

संदर्भ : 1. मा. उच्च न्यायालय दि.23/02/2022 रोजीचा निर्णय.
2. मा. सर्वोच्य न्यायालय दि.25/09/2023 रोजीचा आदेश.
3. महाराष्ट्र शासन राजपत्र (उद्योग उर्जा व कामगार विभाग) दि.22/02/2023.

उपरोक्त संदर्भान्वये मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्या न्यायालयच्या निर्णय/आदेशा प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासनाकडील उद्योग उर्जा व कामगार विभागाच्या राजपत्रान्वये महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन, अधिनियम, 2017 क्रमांक मदुवआ-06/2022/प्र.क्र.100/कलम-10-व्दारे, दि.22/02/2023 पासून त्यांच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रांमध्ये नामफलक मराठी भाषेत असण्या संबंधित असणाऱ्या उक्त अधिनियमाच्या कलम 36 (क) च्या तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असेल, अशा आस्थापनांकडे मराठी देवनागरी भाषेसह इतर भाषेतील व लिपीतील नामफलक असू शकतील, परंतू अशावेळी मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरवातीलाच लिहिणे आवश्यक राहील आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
सबब, सदर अधिनियमानुसार नाशिक महानगरपालिका क्षेत्रांतील सर्व दुकाने व आस्थापना धारकांनी त्यांच्या दुकानांवरील आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत करणे अनिवार्य आहे. ज्या आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत आढळून येणार नाहीत, त्यांच्या आस्थापनेवर मा. न्यायालयाच्या आदेशान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
तरी, नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, वाणिज्यिक संस्था, हॉटेल्स इत्यादींना महानगरपालिकेतर्फे जाहिर आवाहन करण्यात येते, नामफलक मराठी भाषेत करणेत यावे. ज्या आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत नसतील अशा आस्थापना धारकांना मा. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या आस्थापनांवर प्रत्येक कामगार प्रमाणे र.रु. २०००/- (अक्षरी- दोन हजार रुपये मात्र) अशी दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तरी सर्व दुकाने व आस्थापना यांनी आपले नामफलक तात्काळ मराठी देवनागरी भाषेत ठळकपणे प्रसिध्द करावेत असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर व उपआयुक्त (कर) श्रीकांत पवार महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Bharat News1
Author: Bharat News1

भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।

वेब पोर्टल चैनल:- https://bhartnews1.com
यूट्यूब चैनल:- https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
व्हाट्सएप चैनल :- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like

Read More