भारत न्यूज 1 नाशिक
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात आज भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे समन्वयक डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या शुभहस्ते नाशिकरोड व पंचवटी येथील विभागीय कार्यालय येथे संपन्न झाला.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्रशासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना आयुष्यमान भारत योजना, पीएम जनधन योजना, पीएम सुरक्षा विमा योजना, भारतीय जन औषधी योजना, अटल पेन्शन योजना, आत्मनिर्भर भारताच्या विकासाचे दृष्टीने नव्या युगाची सुरुवात अशा विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती व शिबिराचे आयोजन नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून दिनांक २८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान शहरातील विविध ६० ठिकाणी या यात्रेद्वारे आयोजन करण्यात आलेले आहे. नाशिकरोड विभागीय कार्यालयात यात्रेचा शुभारंभ फित कापून डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केला.
या कार्यक्रमास नाशिक महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड ,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ तानाजी चव्हाण,नाशिकरोड विभागाचे विभागीय अधिकारी सुनीता कुमावत, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, नाशिकरोड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता निलेश साळी डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. शिल्पा काळे यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आज या विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभाच्या वेळी यात्रेच्या डायरीचे आणि कॅलेंडरचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी लाभार्थ्यांनी शिबिरात भाग घेतला त्यांचे त्वरित आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड त्याचबरोबर विविध लाभार्थ्यांना त्यांचे परिचय कार्डाचे वाटप नाशिक महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मेरी कहानी मेरी जुबानी हा देखील उपक्रम राबविण्यात आला.तसेच उपस्थित नागरिकांना संकल्प विकसित भारताची शपथ नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी दिली.
आज नाशिकरोड विभागीय कार्यालय आणि पंचवटी विभागीय कार्यालय येथे ही भारत विकसित संकल्प यात्रा हे दोन टप्पे पार पडले.२८ डिसेंबर पर्यंत शहरातील३१ प्रभागात ६० ठिकाणी हा रथ जाणार असून शिबिराचे आयोजन या ६० ठिकाणी होणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी नाशिक रोड विभागीय कार्यलयात तर दुपारी पंचवटी विभागीय कार्यलयात कार्यक्रम पार पडला शुभारंभ आज एलईडी व्हॅनला अतिरिक आयुक्त प्रदीप चौधरी यांनी हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.यावेळी चौधरी यांनी आयोजित शिबिरातील विविध स्टॉलला भेटी दिल्या. यावेळी उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंढे,समाजकल्याण उपायुक्त प्रशांत पाटील,पंचवटी विभागाचे विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यावेळी उपस्थित होते.या विकसित भारत संकल्प शहरातील आपल्या भागात आल्यानंतर त्याचा लाभ नागरिकांनी घेऊन केंद्र आणि राज्य शासनाच्या या योजनांची माहिती घेऊन विविध शिबिरात सहभाग घेण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासन डॉ. अशोक करंजकर ,अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यासह उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे,यांनी केले आहे.