भारत न्यूज 1 नाशिक
धर्माच्या नावावर कोणी मुर्ख बनविणार नाही याची खबरदारी घेणे व जीवनाच्या सत्याचा शोध घेणे म्हणजेच धार्मिक होणे होय.
धर्माच्या नावाखाली जर काही स्वार्थी राजकारणी स्वतःची स्वार्थाची भाकर भाजण्याचा प्रयत्न करत असतील तर तो कट हाणून पाडने आवश्यक आहे. नागरिक हा धार्मिक असावा, भाविक असावा, जागृत असावा – मुर्ख कधीच नसावा. उत्तिष्ठत! जाग्रत! उठा! जागे व्हा!
जगात दोन प्रकारचे संन्यासी, महाराज, बाबा, बुवा इत्यादि असतात. वर वर पाहता दोन्ही वर्गातील लोक सारखेच दिसतात.
पहिला प्रकार असतो जो शाश्वत सत्याच्या शोधात गृहत्याग करतो राजकुमार सिद्धार्था सारखा. राजकुमार सिद्धार्थ हा नेहमीच बाजारविरोधी, बाजारू संन्यासी बाबा बुवा स्वामी महाराज यांना न पचनाराच असतो. कारण हा राजकुमार सिद्धार्थ शाश्वत सत्याच्या / बुद्धत्वाच्या शोधात निघालेला असतो, रोजगाराच्या शोधात नव्हे.
दुसरा प्रकार जो असतो त्याला भगव्या कपड्यांमधे, लोकांच्या धार्मिक भावनांमधे मोठी रोजगाराची, धन कमविण्याची संधी दिसते. मग अश्या निकृष्ट दर्ज्याच्या लोकांना हाताशी घेऊन खेळ सुरु होतो तो धर्मबाजाराचा. स्वार्थी राजकारण्यांना अश्या स्वार्थी धनलोलुप निकृष्ट दर्जाच्या बाबा बुवा महाराज किर्तनकार स्वामी अम्मा यांची फारच आवश्यकता असते कारण हे दोघेही एकमेकांसाठी अनुकुल असतात कारण या दोघांनाही खऱ्या धर्माशी काहीही घेण देण नसते. दोघांचाही हा रोजगार असतो. व स्वार्थी राजकारण्यांना अनुकुल असे बाबा, बुवा, महाराज, स्वामी, अम्मा जर बाजारात उपलब्ध नसतील तर स्वार्थी वासनांध राजकारणी असे पाखंडी धर्माचार्य तयार करतात व स्वतःचा स्वार्थी हेतु साध्य करतात. जसा वासनांध रावण लक्ष्मीस्वरूपिणी सितेचे अपहरण करण्यासाठी भगवे कपडे धारण करतो व स्वतःचा घृणास्पद हेतु साध्य करतो तसेच हे राजकारण्यांचे दास, गुलाम वासनांध धर्माचार्य विविध धार्मिक वेष धारण करणात व लोकांची फसवणूक करतात. प्रश्न विचारा. अभ्यासु व्हा. दृष्टि तीक्ष्ण ठेवा.
बुद्धत्त्वाच्या प्राप्तिसाठी निघालेला राजकुमार सिद्धार्थ हा बाजारू धर्मासाठी घातकच असतो.
धर्माचा उद्देश्य आहे – प्रत्येक व्यक्तिला स्वतःमधील शाश्वत सत्याच्या अनुभूति पर्यंत पोहचविणे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडने म्हणजे धर्म. जीवनात सदा स्थिरतेची अनुभुति म्हणजे धर्म.
– स्वामी श्रीकंठानंद (प्रवर्तक – जागृत नाशिक जागृत भारत अभियान)
![Bharat News1](https://secure.gravatar.com/avatar/b456ec41578bec6e8f2757e0ad057200?s=96&r=g&d=https://bharatnews1.com/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)