भारत न्यूज 1 नाशिक
नाशिक शहरात दिवाळीच्या रात्री 11 वाजता सुमारास मेट्रो येथे एक कापड्याच्या दालनात भीषण आग लागल्याचा प्रकार घडल्या होता. आग लागल्यानंतर तत्काळ फायर ब्रिगेड चे बंब जागी आणण्यात आले आणी रात्र भर 18 बंब ने आगी बुजविण्यात आली.
दिनांक १२ नोव्हेंबर रोजी रात्री ११वाजून १५ मिनिटांनी रेड क्रॉस सिग्नल मेन रोड येथे व कपड्याच्या दुकानाला आग लागली. तात्काळ घटनास्थळी फायर ब्रिगेडचे एकूण बंब आग आटोक्यात आणण्यासाठी पोहोचले रात्री एकूण १८ बंब मुख्य अग्निशमन केंद्र तसेच सातपूर सिडको पंचवटी या फायर स्टेशन वरून आणण्यात आले होते. महानगरपालिकेचे अधिकारी देखील घटनास्थळी मार्गदर्शन करीत होते. यामध्ये नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त श्रीकांत पवार उपायुक्त प्रशांत पाटील उपायुक्त नितिन नेर,स्वीय सचिव दिलीप काठे घटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी घटनास्थळी होते. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. अतिशय अडचणीच्या ठिकाणी ही आग लागल्यामुळे रात्रभर फायर ब्रिगेडचे अधिकारी,कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणली. चीफ फायर ऑफिसर बैरागी, परदेशीआणि त्यांची सर्व टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.