भारत न्यूज 1 नाशिक
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
*रक्तदान शिबिरात ७८ रक्तदात्यांनी केले रक्तदान*
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे मनपा आरोग्य वैद्यकीय विभाग व सेवा संदर्भ रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान केले.या शिबिराचे उद्घाटन प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमास उपायुक्त श्रीकांत पवार,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण,विभागीय रक्त संक्रमण अधिकारी डॉ.पुरुषोत्तम पुरी,डॉ.गणेश गरुड,डॉ.प्रशांत शेटे, डॉ.योगेश कोशिरे, डॉ. चारुदत्त जगताप, डॉ कल्पना कुटे,डॉ.विजय देवकर,डॉ.जितेंद्र धनेश्वर,डॉ.अजिता साळुंखे,डॉ.विनोद पावसकर,डॉ.शैलेश लोंढे, डॉ.योगेश कोशिरे,मुख्यलेखापरीक्षक प्रतिभा मोरे ,जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद डॉ. दीपक पाटील,जयश्री नागपुरे, मनोज बिरकुरे,वैशाली मरडे,दीपक महाजन,रागिनी देसाई,रूपाली मैड,मनोहर जाधव,प्रशांत शिंदे, पवन हिरे,अविनाश गायधनी,कमलाकर भोये.यांचे सह मनपा व संदर्भ सेवा रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
*पर्यावरण संवर्धनासाठी सायकल रॅली*
नाशिक महानगरपालिकेच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण पूरक आणि स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पर्यावरण संवर्धनासाठी सायकलिस्ट फाउंडेशनने आज सकालिं ७ वाजता सायकल रॅली काढली.
मनपाच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीमध्ये ३०० च्या वर सायकलिस्ट सहभागी झाले होते. सायकलिस्ट फाउंडेशनच्या या सर्व सदस्यांना नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी शुभेच्छा देऊन या रॅलीचा शुभारंभ हिरवा झेंडा देऊन केला.नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे माजी अध्यक्ष प्रवीण खाबिया, चंद्रकांत नाईक डॉ.मनीषा रौदळ यांनी सायकलिस्ट सदस्यांना मार्गदर्शन केले. सायकल रॅलीचा समारोप झाल्यानंतर पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले.या सायकल रॅलीमध्ये सचिव अरुण पवार, डॉ.दीपक भोसले, मनोज गायधनी जयेश पवार, मंगला सुरसे यांसह सायकललिस्ट सहभागी झाले होते.
आपल्या पृथ्वीसाठी स्वाक्षरी प्रतिज्ञाचा शुभारंभ व या सायकल रॅलीचा समारोप उपायुक्त प्रशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सायकल रॅली यशस्वी करणहासाठी एन सी सी चे विद्यार्थी,निरी,कॅप इंडिया,स्विस एनर्जी, टेरी आदी स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केले.
*सत्यनारायण पूजा तीर्थप्रसाद*
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे प्रशासन विभागाच्या वतीने सत्यनारायण पूजा व तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या ठिकाणी आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांच्यासह मनपाचे खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी यांनी तीर्थप्रसाद घेतला.