भारतन्यूज1 नाशिक
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अश्विनी पौर्णिमा या तिथीनुसार महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण,कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत व माजी नगरसेवक सुरेश दलोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.या कार्यक्रमास जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, सुरक्षा अधिकारी देवानंद शिंदे, उपअभियंता किरण लोणे, अतिरिक्त आयुक्त यांचे स्वीय सचिव कैलास दराडे,नितीन गंभीरे,अनिल गावंडे,अजय कमोद,नरेंद्र गायखे,हुसेन पठाण, सागर पीठे, वीरसिंग कामे, संतोष घोडे सरकार, विठ्ठल भोईर, राजेंद्र अमृतकर, विजू वाघमारे,रवी पवार,निखिल कुमावत, पवन वझरे,मयूर चराटे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.