भारत न्यूज 1 नाशिक
नाशिक शहरातील व औद्योगिक वसाहतीमधील आगीच्या वाढत्या धोक्यांचे प्रमाण लक्षात घेता आज दि. २७/१०/२०२३ रोजी नाशिक मनपा अग्निशमन विभागाकडुन नाशिक मनपा राजीवगांधी भवन येथील प्रशासकीय इमारतीमध्ये फ्रांन्स कंपनीने तयार केलेला रिमोट कन्ट्रोल रोबोटची प्रत्यक्ष पाहणी केली व त्याची चाचणी घेतली आहे.. भविष्यात धोकेदायक ठिकाणी ज्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान / अधिकारी यांना काम करणे शक्य होणार नाही उदा. तळाघरामध्ये, धुरामध्ये, त्याचप्रमाणे केमिकल टँक असतील किंवा LPG टँक / बुलेट, इलेक्ट्रीक वाहने / LPG / CNG या वाहनांची आग विझवीणेकामी सदर रोबोटचा वापर करता येईल. जेणेकरून अग्निशमन जवानांना कुठलाही धोका उद्भवणार नाही.
*भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।* *वेब पोर्टल चैनल:-* http://www.bhartnews1.com *यूट्यूब चैनल:-* https://www.youtube.com/@Bharatnews1-23 *टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel *व्हाट्सएप चैनल :-* https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO *फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL
सदरचा रोबोट हा बॅटरीवर चालणारा आहे. बॅटरी कंपेसिटी एका वेळेस १२ तास काम करु शकता व एक बॅटरी स्टॅण्डवाय राहील. त्यामुळे २४ तास फायर फायटींगचे काम चालू राहिल. बॅटरी चार्जिंग करणेकामी ४ ते ५ तासाचा कालावधी आहे. सदर रोबोटची चेसिज हि उच्च प्रतिच्या धातुची आहे. तो ८०० डि.सेंटीग्रेट तापमाण सहन करु शकते. रोबटवरती असणार वॉटर मॉनिटर जवळपास ६० मिटरचा थ्री देणारा आहे. त्याची प्रत्यक्ष चाचणी घेतली आहे. रोबोटचे जिणा चढणे / उतरणेचा स्लोप ४० डिग्री आहे. साईड स्लोप ३५ डिग्री इतका आहे. त्याची प्रत्यक्ष चाचणी घेतली आहे. रोबोटचे ब्रेक हे इलेक्ट्रोमॅग्नेटीक आहे. रोबोटच्या समोरील भागास LED लाईट आहे. व धर्मल इमेज कॅमेरा आहे. अशा प्रकारे नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवलेला रोबोट आहे. मोठ्या आगीच्या घटनेच्या ठिकाणी तसेच धोकेदायक क्षेत्रामध्ये जिवीत व मालमत्तेचे रक्षण करणेकामी खुप मोठया प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे. प्रत्यक्ष चाचणी घेतेवेळेस मा अति आयुक्त सो., मा. उप आयुक्त, मा. शहर अभियंता सो., मा. कार्यकारी अभियंता, अग्निशमन विभागातील कर्मचारी / अधिकारी व कंपनीचे इंजिनियर उपस्थीत होते.