भारत न्यूज 1 नाशिक
गंगापूर धरण येथे नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर, यांचे शूभहस्ते गंगापूर धरण येथे विधीपूर्वक जलपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात पाटबंधारे विभागाच्या जलाशयातून म्हणजेच गंगापूर धरण समुहातून पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो. नाशिक मनपा मार्फत गंगापूर धरण येथून पाणी पंपींग करुन जलशुध्दीकरण प्रक्रिया करुन जलकुंभा द्वारे पाणी पुरवठा करुन केला जातो. गंगापूर धरण यंदा १००% भरले असल्याने दरवर्षी प्रमाणे यंदाही नाशिक महानगर पालिकेच्या वतीने मंगळवार दि.१७ ऑक्टोबर २०२३ रोजी जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी गंगापूर धरण येथे नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर, यांचे हस्ते विधीपूर्वक जलपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
*भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।* *वेब पोर्टल चैनल:-* http://www.bhartnews1.com *यूट्यूब चैनल:-* https://www.youtube.com/@Bharatnews1-23 *टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel *व्हाट्सएप चैनल :-* https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO *फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL
या कार्यक्रमाकरीता नाशिक मनपाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे, अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल, अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता, बाजीराव माळी, राजेंद्र शिंदे, रविंद्र धारणकर, प्रकाश निकम, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग डॉ. आवेश पलोड, मुख्यलेखापरीक्षक प्रतिभा मोरे,वित्त व लेखाधिकारी सुरेखा जाधव, विभागीय अधिकारी मयुर पाटील, राजाराम जाधव, मदन हरीश्चंद्र, उपअभियंता शैलेंद्र जाधव, संतोष बेलगांवकर, संजय अडेसरा, राजाराम भोये, स्वीय सचिव दिलीप काठे व पाणी पुरवठा विभागाचे सर्व अभियंता तसेच जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, नाशिक मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांचे स्वागत अधीक्षक अभियंता, संजय अग्रवाल व अविनाश धनाईत यांनी केले. जलपूजनाचे पौरोहित्य अवधूत गायधनी व राहूल बेळे यांनी केले.