भारत न्यूज 1 मुंबई
*नवरात्रौत्सवाच्या काळात दांडियाचे आयोजन करणाऱ्यांना दांडियाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि सर्व सुविधांयुक्त सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.* दैनिक ‘गुजरात समाचार’ चे संपादक निलेश दवे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातील निवेदन दिले होते.
*भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।* *वेब पोर्टल चैनल:-* http://www.bhartnews1.com *यूट्यूब चैनल:-* https://www.youtube.com/@Bharatnews1-23 *टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel *व्हाट्सएप चैनल :-* https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO *फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL
दांडिया खेळताना अनेकदा भान विसरून नाचल्याने अनेकदा हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. तसेच कोरोनानंतर अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे देखील अनेक अहवालातून समोर आले आहे, बदलत्या जीवनशैलीमुळे विविध विकारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोणतीही वैद्यकीय सहाय्याची तातडीची परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे, ही गरज लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी अशी सुविधा सर्व आयोजकांनी उपलब्ध करून द्यावी ,असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.