भारत न्यूज 1नाशिक
नाशिकरोड भागातील नेहरू गार्डन येथे झालेल्या नविन भिंतीला रस्त्यालगत वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या टपऱ्या व वडनेर दुमला येथील अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविले गेले.
नाशिक महानगरपालिका हद्दीतील मागील बऱ्याच दिवसापासुन नाशिकरोड भागातील नेहरू गार्डन येथे झालेल्या नविन भिंतीला रस्त्यालगत वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या काही टपरी धारकांनी स्थायी समितीचे ठराव दुकानाला लावून व्यवसाय थाटलेले होते. या टपरी धारकांना वेळोवेळी टपरी हटविण्याच्या सूचना अतिक्रमण विभागामार्फत देण्यात आलेल्या होत्या. अखेर प्रशासक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या आदेशानुसार, उपआयुक्त नितीन नेर , विभागिय अधिकारी मदन हरिशचंद्र यांच्या मार्गदर्शनानुसार मंगळवारी अतिक्रमण निर्मूलन मोहीम घेण्यात आली.या मोहीमे दरम्यान नाशिक महानगरपालिका. नाशिक अतिक्रमण विभागातील सर्व कर्मचारी, पोलीस प्रशासन, बांधकाम विभाग, विद्युत विभाग, पाणी पुरवठा विभाग, उद्यान विभाग, वैद्यकीय विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
*भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।* *वेब पोर्टल चैनल:-* http://www.bhartnews1.com *यूट्यूब चैनल:-* https://www.youtube.com/@Bharatnews1-23 *टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel *व्हाट्सएप चैनल :-* https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO *फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL
मनपाचा अतिक्रमण निर्मुलनाचे पथक सदर ठिकाणी दाखल होताच सदर अतिक्रमण धारकांनी आपले अतिक्रमण स्वता: काढुन घेतले. तसेच शुभाष रोड येथील नैसर्गिक नाल्यावर ठेवण्यात आलेल्या दोन अनधिकृत टपऱ्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर सदर पथक वडनेर दुमाला या ठिकाणी असलेल्या मनपाच्या आरक्षित जागेवर अनधिकृतपणे आर.सी.सी. बांधकाम करण्यात आलेले होते सदर अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. यापुढे हि मनपा हद्दीत कुठेही अनधिकृत अतिक्रमण केल्यास त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.तरी कुणीही अनधिकृत अतिक्रमण करू नये असे आवाहन मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
संपादक देवराज सोनी