भारत न्यूज 1 नाशिक
नाशिक महापालिका स्तरावरील गोदावरी उपसमितीची बैठक आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांच्या उपस्थितीत पार पडली.त्यात विविध विषयांवर चर्चा होऊन गोदावरी नदी प्रदूषण कमी होईल याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना या बैठकीत दिल्या
उच्च न्यायालय मुंबई येथील जनहित याचिका क्रमांक १७६/२०१२ संदर्भात नाशिक महापालिका स्तरावरील उपसमितीची बैठक आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली त्यात प्रामुख्याने गोदावरी नदी पात्रातील अतिक्रमण काढणे,पूररेषेतील बांधकामांवर कारवाई करणे,प्लास्टिक वापराबद्दल संबंधितांवर कारवाई करणे, नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे,नदीच्या पुलावर जाळ्या बसवीणे, ठिकठिकाणी सूचना फलक लावणे, निर्माल्य टाकू नये याबाबत आवाहन करणे, गोदावरी प्रदूषण व प्लास्टिक मुक्तीच्या दृष्टीने शिक्षण विभागाच्या माध्यमातून जनजागृती करणे,रामकुंड परिसर गोदा पात्रालगत वाहन तळाचे नियोजन करणे, नदी पात्रात सांडपाणी मिश्रित होत असेल ते थांबविणे, ज्यांनी सांडपाणी नदीपात्रात सोडले आहे त्यांच्यावर कारवाई करणे, नदीपात्रालगत निर्माल्य कलश ठेवण्याची व्यवस्था करणे आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,पर्यावरण विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंडे, स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे,निरी संस्थेचे श्री.गोयल,महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण मंडळाचे प्रदेशिक अधिकारी श्री दूरगुडे,माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर ईगवे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल, अविनाश धनाईत,उपायुक्त नितीन नेर, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड, सुरक्षा अधिकारी शिंदे,अशासकीय सदस्य राजेश पंडित आदी अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.