Search
Close this search box.

नाशिक महानगरपालिकेच्या नाशिकरोड कार्यालय अंतर्गत प्रतिबंधित प्लास्टिक विक्री विरोधात कारवाई

भारत न्यूज 1 नाशिक

नाशिकरोड येथे दिनांक ७ ऑक्टोबर रोजी दुसऱ्यांदा दंडात्मक कारवाई करून१०००० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच जेलरोड येथील भाजी मार्केट येथे प्रथम दंड रक्कम रुपये ५००० करण्यात आला असा एकूण १५००० रुपये दंड करण्यात आला. सदर कारवाई नाशिक महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या आदेशान्वये नाशिकरोड विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, विभागीय स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक विजय जाधव, सागर बारगळ, तेजस गायकवाड, स्वच्छता मुकादम रणजित हंसराज, सुनील वाघ, गुलाब शेख, अतुल भाऊसार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅग व इतर वस्तू वापरू नये असे आवाहन यापूर्वी नाशिक महानगरपालिकाच्या वतीने करण्यात आले आहे मात्र व्यवसायिक याचा वापर करतांना आढळल्यास धडक कारवाई करण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिले आहे.

1

Bharat News1
Author: Bharat News1

भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।

वेब पोर्टल चैनल:- https://bhartnews1.com
यूट्यूब चैनल:- https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
व्हाट्सएप चैनल :- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like

Read More