भारत न्यूज 1 नाशिक संपादक
चाळीसगाव शहरातील डेराबर्डी जवळ असणाऱ्या नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेला काल आमदार मंगेश रमेश चव्हाण ने अचानक भेट दिली असता अतिशय विदारक चित्र त्याठिकाणी निदर्शनास आले. सदर निवासी शाळेतल्या विद्यार्थ्यांना अक्षरशः आपण गुरांना खाऊ नाही घालत अश्या सडलेल्या, किडलेल्या भाजीपाल्याचे जेवण बनवले जात असल्याचे माझ्या लक्षात आले. कांदा सडलेला, कोबी किडलेली, बिट सडलेले, गिलके पिकलेले, तांदूळ खराब असल्याने यापासून बनवलेले जेवण विद्यार्थ्यांना देणे म्हणजे त्यांच्या जीवाशी एकप्रकारे खेळ आहे.
शाळेतील शौचालय व स्नानगृहे यांचे दरवाजे तुटलेले आढळले. तसेच बेड ज्या साईज चे होते मात्र त्यावर असणाऱ्या गाद्या छोट्या होत्या.सर्वात गंभीर बाब म्हणजे शाळेच्या शैक्षणिक दर्जा अतिशय खालावलेला दिसून आला. दहावी मधील विद्यार्थ्याला इंग्रजी वाचता येत नव्हते तर सहावीतल्या विद्यार्थ्यांला आपल्या आईचे नाव लिहिता आले नाही.
क्या आप भारत के जागृत और देशभक्त नागरिक हैं।अगर आप है तो हमारे न्यूज चैनल्स के साथ जुड़कर आप अपने क्षेत्र के तहसील क्षेत्र पंचायत, जिला क्षेत्र पंचायत और राज्य के सामाजिक, धार्मिक, राजनीतिक, शैक्षणिक संस्थाओं के समाचार भेजकर पत्रकार और हमारी न्यूज चैनल्स के प्रेस प्रतिनिधि बन सकते हैं और आप अपने राज्य में जनजागृति बढ़ाने में अपना योगदान दे सकते हैं।हमारे साथ जुड़ने के लिए नीचे दिए गए लिंक पर आप जुड़कर अपना सहयोग प्रदान कर सकते हैं।???????????????????????????????? *भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।* *वेब पोर्टल चैनल:-* http://www.bhartnews1.com *यूट्यूब चैनल:-* https://www.youtube.com/@Bharatnews1-23 *टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel *व्हाट्सएप चैनल :-* https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO *फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून अतिशय चांगल्या सुविधा असणारी शाळा उभी केली आहे, येथे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या फक्त जेवणावर महिन्याला १८०० रुपये खर्च शासन देते. यासोबतच शिक्षकांना लाखोंचा पगार, सोयी सुविधा शासन देते, पालक देखील मोठ्या अपेक्षेने मुलांना याठिकाणी शिक्षणासाठी पाठवतात. मात्र इकडे ठेकेदार व प्रशासनाची भ्रष्ट युती विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ करत आहे. तसेच शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षणाचा दर्जा खालावल्याने भावी पिढीचे देखील नुकसान होत आहे.
भाजपा सेना महायुती सरकार अतिशय संवेदनशीलपणे राज्याच्या हितासाठी काम करत आहे. दलित, आदिवासी, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत मात्र त्या शाळेच्या स्वयंपाकघरात किडलेल्या भाजीपाल्याप्रमाणे प्रशासकीय यंत्रणा देखील किडली असल्याने शासनाच्या गरीब कल्याणाच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे असं मला वाटतं.मी सदर गंभीर बाबींची तक्रार मुख्यमंत्री महोदय, समाजकल्याण विभागाचे सचिव यांच्याकडे करणार असून यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच यापुढे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे जेवण, चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण मिळालेच पाहिजे यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील असे आमदार मंगेश रमेश चव्हाण