भारत न्यूज 1 अमरावती
खडकपूर्णा धरणातून राजरोष पणे रेती उत्खनन सुरू
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त संत चोखासागर धरणातील बेटावर दिनांक 2 ऑक्टोंबर पासून अवैद्य रेती उत्खननाबाबत विभागीय आयुक्त अमरावती यांनी चौकशी समिती गठित केली होती कार्यालयाकडे चौकशी समितीकडून सादर झालेल्या अहवालानुसार संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही होण्यासाठी अनिल चित्ते शिवसेना तालुकाप्रमुख देऊळगाव राजा तसेच विकास गवई शिवसेना तालुका प्रवक्ते हे बेमुदत आमरण उपोषणास बसले आहे.
भारत न्यूज 1 वेबसाईटला भेट द्या आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा बातमी शेअर करा *भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।* *वेब पोर्टल चैनल:-* http://www.bhartnews1.com *यूट्यूब चैनल:-* https://www.youtube.com/@Bharatnews1-23 *टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel *व्हाट्सएप चैनल :-* https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO *फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKw
गेल्या तीन वर्षापासून देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणा मधून होत असलेले अवैद्य रेती उत्खननामुळे तसेच लिलाव झालेल्या घाटातून तसेच अवैध्य स्टॉकच्या हराशी मधून झालेल्या बनावट लिलावाची व भ्रष्टाचाराची चौकशी होण्यासाठी उपोषण सुरू केले आहे या बाबत नदीकाठील परिसरातील सरपंच ग्रामस्थांनी संबंधित जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी सादर केल्या या अवैद्य रेती उत्खननामुळे गावअंतर्गत परिसरातील संपूर्ण रस्ते खराब झाले त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत जावे लागते शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होत आहे या रेती उत्खनन करणाऱ्या टिप्पर मुळे शेतकऱ्यांचे जीव गेले आहेत तसेच शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडाला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार आर्थिक गैरव्यवहार करणारे उपविभागीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार मंडळ अधिकारी व तलाठी आहेत आणि वाळू माफियांवर कारवाई होत नसल्यामुळे अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची दादागिरी वाढली आहे जर एखाद्या शेतकऱ्याने रस्ता अडवला तर जीवे मारण्याच्या धमक्या देतात याबाबत संपूर्ण तक्रारी, धरणे आंदोलने करून सुद्धा शासन या गंभीर विषयाकडे लक्ष देत नाही आणि झोपेचे सोंग करून वेळ मारून नेत आहे आणखी किती निष्पाप लोकांचे बळी घेणार असा सवालही उपस्थित केला आहे उपोषणकर्ते अनिल चित्ते विकास गवई यांनी संत चोखासागर धरणामध्ये जगु किंवा मरू असा निर्धार करून उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत संबंधितावर निलंबनाची कारवाई करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असा निर्धार केला आहे
तसेच नदीकाठील गावातील या अवैद्य रेतीच्या उत्खननामुळे त्रस्त असलेल्या सरपंचांनी शेकडो शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी या उपोषणाला समर्थन दर्शविले आहे आणि मोठ्या संख्येने भेटीत देत आहे.