Search
Close this search box.

नाशिक मनपा नाशीक शहरामध्ये राबविणार सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम

भारत न्यूज 1 नाशिक

` *नाशीक मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांचे नागरिकांना मोहिमेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन* 

राष्ट्रिय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत नाशिक महानगरपालिका क्षयरोग विभाग यांचे वतीने संयुक्त क्षयरुग्ण शोध मोहीम अभियान दि.३ आक्टोबर ते १३ आक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये अतिजोखमीच्या भागात राबविण्यात येणार आहे. तरी या मोहिमेमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या घरी येणाऱ्या पथकास घरातील सर्व सदस्यांची तपासणी करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन क्षयरोग विभाग, नाशिक महानगरपालिका यांनी केले आहे.

या मोहिमेकरिता १०० पथकांची नियुक्ती करण्यात आली असून त्याद्वारे शहरातील विविध भागांमधील ४९१३७ घरांना भेटी देऊन २२६२५६ लाख लोकसंख्येची या पथकांद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.

या तपासणीमध्ये क्षयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांचे समुपदेशन पथकातील आशा स्वयंसेवीकांमार्फत करून या संशयीत क्षयरुणांची मोफत थुंकी, मोफत एक्स-रे तपासणी नजीकच्या महानगरपालिका दवाखान्यात करण्यात येणार आहे. यामधून क्षयरोगाचे निदान झालेल्या क्षयरुणांना त्वरीत मोफत औषधोपचार सुरू करण्यात येतील तसेच निदान झालेल्या क्षयरुणांना केंद्र शासनामार्फत त्यांचे उपचार सुरू असेपर्यंत त्यांच्या बँक खात्यात दरमहा ५००/- रु निक्षय पोषण योजनेंतर्गत पोषण आहारासाठी देण्यात येतात.

क्या आप भारत के जागृत और देशभक्त नागरिक हैं।अगर आप है तो हमारे न्यूज चैनल्स के साथ जुड़कर आप अपने क्षेत्र के तहसील क्षेत्र पंचायत, जिला क्षेत्र पंचायत और राज्य के सामाजिक, धार्मिक, राजनीतिक, शैक्षणिक संस्थाओं के समाचार भेजकर पत्रकार और हमारी न्यूज चैनल्स के प्रेस प्रतिनिधि बन सकते हैं और आप अपने राज्य में जनजागृति बढ़ाने में अपना योगदान दे सकते हैं।हमारे साथ जुड़ने के लिए नीचे दिए गए लिंक पर आप जुड़कर अपना सहयोग प्रदान कर सकते हैं।????????????????????????????????

*भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।*

*वेब पोर्टल:-* http://www.bhartnews1.com
*यूट्यूब चैनल:-* https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
*व्हाट्सएप चैनल :-* https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

या मोहिमेसाठी शहरातील नाशिक, मध्य नाशिक, सातपुर, नाशिक रोड, सिडको या पाच क्षयरोग पथकांतर्गत येणाऱ्या नागरी आरोग्य केंद्रस्तरावर आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक, क्षेत्रीय कर्मचारी व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे पथक घरो घरी जाऊन भेटी दरम्यान क्षयरोगाविषयी माहिती तसेच मार्गदर्शन करणार आहेत. या मोहिमेदरम्यान प्रत्येक तपासणी झालेल्या घरावर एल अक्षर, क्रमांक व तारीख नोंदविण्यात येणार आहे.

या मोहिमेमध्ये सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात निदान, उपचार सुविधा पुरविण्यात येणार आहेत तसेच प्रधाममंत्री टीबी मुक्त कार्यक्रमांतर्गत समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, ( निक्षय मित्र) यांचेमार्फत क्षयरुग्णांना मोफत शिधा वाटप करण्यात येते यासाठी देखील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून क्षयरोग मुक्त भारत करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण यांनी केले आहे.

*क्षयरोगाची लक्षणे* दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला,वजनात लक्षणीय घट होणे,भूक मंदावणे,मानेवर गाठी येणे ,थुंकीद्वारे रक्त पडणे याप्रकारची लक्षणे असलेल्या संशयित क्षयरुग्णांनी स्वतःहून पुढे येऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन शहर क्षयरोग अधिकारी, मनपा डॉ. आवेश पलोड यांनी केले आहे.

1

Bharat News1
Author: Bharat News1

भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।

वेब पोर्टल चैनल:- https://bhartnews1.com
यूट्यूब चैनल:- https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
व्हाट्सएप चैनल :- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like

Read More