भारत न्यूज 1 नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बिलोली तालुक्यातील आदमपूर फाटा येथून जाणाऱ्या देगलूर नांदेड या राज्य महामार्गावर धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजास अनुसूचित जमाती या प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी आदमपूर येथील धनगर समाजाचे युवा कार्यकर्ते प्रभाकर पेंटे यांच्या नेतृत्वाखाली तारीख 30 सप्टेंबर रोजी रास्ता रोको करण्यात आला आहे.
क्या आप भारत के जागृत और देशभक्त नागरिक हैं।अगर आप है तो हमारे न्यूज चैनल्स के साथ जुड़कर आप अपने क्षेत्र के तहसील क्षेत्र पंचायत, जिला क्षेत्र पंचायत और राज्य के सामाजिक, धार्मिक, राजनीतिक, शैक्षणिक संस्थाओं के समाचार भेजकर पत्रकार और हमारी न्यूज चैनल्स के प्रेस प्रतिनिधि बन सकते हैं और आप अपने राज्य में जनजागृति बढ़ाने में अपना योगदान दे सकते हैं।हमारे साथ जुड़ने के लिए नीचे दिए गए लिंक पर आप जुड़कर अपना सहयोग प्रदान कर सकते हैं।???????????????????????????????? *भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।* *वेब पोर्टल चैनल:-* http://www.bhartnews1.com *यूट्यूब चैनल:-* https://www.youtube.com/@Bharatnews1-23 *टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel *व्हाट्सएप चैनल :-* https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO *फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL
महाराष्ट्रात व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने धनगर समाजास अनुसूचित जमाती या प्रवर्गात समाविष्ट करण्याचा दिलेला शब्द पाळले नसल्याने देगलूर बिलोली या दोन तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने तारीख 30 रोजी सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत चक्काजाम आंदोलन करत शासनाचा निषेध केला आहे. यावेळी धनगर समाजाचे सर्वपक्षीय पदाधिकारी धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करत सत्तेत असलेल्या भाजप प्रणेते शासनाचा यावेळी निषेध केला आहे. यावेळी धनगर समाजाच्या प्रमुख वक्त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजास आरक्षणाचा दिलेला शब्द पाळला नसल्याने त्यांचा यावेळी निषेध करण्यात आला आहे. दोन्ही तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधव देगलूरहून नांदेड कडे जाणारे व नांदेड कडून देगलुर कडे जाणारे दोन्ही कडील वाहतूक तब्बल तीन तास चक्काजाम केला होता . यावेळी दोन्हीकडच्या बाजूला वाहनाची रांगाच रांगा लागली होत्या .यावेळी धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्याकडून रस्त्यावर टायर जाळून पूर्णपणे रस्ता जाम केला होता. या आंदोलनात यावेळी देगलूर तालुक्यातील पिराजी राजुरे, ज्ञानेश्वर चिंतले, गणेश पाणारे, नागनाथ कोकणे, मारुती लाळे, डॉ.जितेंद्र आमोघे,डॉ. राहुल माका, भांगे देगलूरकर, उत्तम वाडेकर, आनंद राजुरे, संजय औरादे, ज्ञानेश्वर कोकणे, प्रकाश काळे तसेच बिलोली तालुक्यातील प्रभाकर पेंटे, अंबादास शिंनगारे, अरविंद पेंटे, चंद्रकांत देवारे, मारोती रहिरे, साईनाथ चिंतले , आकाश कोकणे, श्याम मजगे, गंगाधर प्यादेकर, प्रशांत वानोळे, विठ्ठल माने, साईनाथ छपेवार, शिवकांत मैलारे, शंकर भंडारे, शंकर परसुरे, रमेश लष्करे, पुरुषोत्तम अब्दागिरे, बाळासाहेब चट्टे , शिवाजी पिकले,बळवंत पाटील, बसवंत बावलगावे, बालाजी नाईक, राम भत्ते, देवाले मलबा, राजेश्वर वानोळे, यादव कोकणे, कोंडीबा एस्के यासह देगलूर बिलोली तालुक्यातील धनगर समाज मेंढरं -घोंगडी घेऊन बहुसंखयाने उपस्थित राहुन रामतीर्थ बिलोली पोलीस ठाण्याच्या सहकार्याने आपले चक्काजाम आंदोलन शांततेत पार पाडले आहे.