*‘स्वच्छता पंधरवडा – स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी १ ऑक्टोबर रोजी राज्यात ‘एक तारीख, एक तास’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरी तसेच ग्रामीण भागातील जनतेने या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.*