भारत न्युज 1 प्रतिनिधी धर्माबाद
धर्माबाद तालुक्यात नांदेड जिल्हा हौशी रग्बी आशोशियशन व नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि तालुका क्रीडा संकुल धर्माबाद , मदार क्रिडा मंडळ , व्यायाम शाळा धर्माबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त तिन दिवसीय जिल्हा स्तरिय रग्बी क्रीडा प्रशिक्षण मोफत शिबिराचे आयोजन केले असून यामध्ये शालेय क्रीडा स्पर्धेकरिता पूर्व तयारीसाठी हे शिबिर घेण्यात आले .
या शिबिराचे उद्घाटक काँग्रेस उपाध्यक्ष शंकर आण्णा बोलमवाड व प्रमुख पाहुणे प्रा. साजीद अंसारी ,मदार क्रिडा मंडळाचे सचिव ताहेर पठाण, माजी नगरसेवक संजय पवार, ज्येष्ठ पत्रकार माधव हनुमंते, नारायण सोनटक्के , क्रीडा संयोजक अहमद लड्डा ,क्रीडा शिक्षक व माजी सैनिक संजय पंदिरवाड, क्रीडा मुख्य प्रशिक्षक बालाजी गाडेकर , मुख्य महिला राणी जाधव, प्रशिक्षिका पार्वती पी. चव्हाण भेंडे पाटील ,उशीलवार यांचे उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला शेवटी पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहमद लड्डा व कार्यक्रमाचे आभार संजय पंदिरवाड यांनी मांडले व पोलीस खेळाडू शेख शब्बीर व दत्तात्रय यांनी परिश्रम घेतले प्रशिक्षणामध्ये धर्माबाद तालुक्यातील जवळपास 200 ते 250 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.