भारत न्यूज 1 जालना जिल्हा प्रतिनिधी
*पारध पोलीस ठाण्यात भोकरदन चे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घेतले पत्रकार परिषद*
दोन करोड .तीस लाख .तेरा हजार .पाचशे रुपयांच्या गांज्या जप्त
भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीतील कल्याणी शिवारातील कारवाईत पकडण्यात आलेला गांजा हा तब्बल 2 करोड 30 लाख13 हजार 500 रुपयेच्या खुलासा आज पोलिसांनी केला आहेत या कारवाई पारध पोलिसांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
जालना जिल्हाचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ .गणेश दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारध पोलीस ठाण्याचे सपोनि चैनसिंग घुसिंगे, उपनिरीक्षक विलास गुसिंगे, विजय आहेर यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी कल्याणी शिवारातील तुरीच्या शेतात छापा मारून 18 गुंठे क्षेत्रातील 23 क्विंटल कंच्चा गांजा ज्याची किंमत 2 करोड 30 लाख 13500 रुपयोचे असल्याचे सांगितले आहेत.
तसेच शेतातील गांज्याची झाडे तोडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह 40 मजुरांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मेहनत घेतली. नंतर ही झाडे दोन ट्रॅक्टरद्वारे पारध पोलीस ठाण्यात आणून शुक्रवारी 22 सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत एका मोठ्या गोडाऊनमध्ये मोठ्या वजन काट्याच्या साह्याने वजन करण्याचे काम आणि पंचनामा करण्याचे काम पोलिसांनी केले आहेत. ही माहिती भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. गणेश दराडे यांनी पारध पोलीस ठाणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहीती दिली आहेत.या वेळी शेतकरी आरोपी गैस खां सरदार खां यांच्या विरोधात पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अरोपी ताब्यात घेतला आहेत अशी माहीती उपविभागीप अधिकारी डॉ गणेश दराडे यानी पञकार परिषदेत माहीती दिली आहेत.
सबस्क्राइब करा आणी शेर करा वेब न्यूज चैनल :- https://bharatnews1.com/ युट्यूब चैनल. :- https://www.youtube.com/@BharatNews1-23 टेलीग्राम चैनल :- https://t.me/bharatnews1newschannel फेसबुक. https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL