भारत न्यूज 1अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट येथील विवेकानंद प्रतिष्ठान गणेशोत्सव चे वतीने प्रति वर्षा प्रमाणे यंदाही व्याख्यान चे आयोजन करण्यात आले आहे…काल अक्कलकोट चे आमदार तथा विवेकानंद प्रतिष्ठान चे अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी व सौ. शांभवीताई सचिन कल्याणशेट्टी यांचे शुभ हस्ते व्याख्यान मालेचे उदघाटन करण्यात आले.आज पाहिल्या पुष्पात कर्नाटक येथील बेंगळुरू च्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ विजयालक्ष्मी बाळेकुंदी यांचे सुंदर असे व्याख्यान पार पडले यावेळी त्यांनी जिवन सुंदर असून हसत खेळत आणि मानसिक तणावात न राहता जगावे.असे आव्हान केले यावेळी पाऊस असताना देखील व्याख्यानमालेला नागरिकाचे उपस्थिती होती. या व्याख्यानमालेचे सुंदर नियोजन विवेकानंद परिवारातील सदस्यांनी केले होते.