Search
Close this search box.

नाशिक जिल्ह्यात 1388 ग्रामपंचायतींमध्ये अमृत कलशाच्या शोभा यात्रा

 

 

 

 

भारत न्यूज 1 नाशीक –  देवराज सोनी ,संपादक 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण देशातील राबवण्यात येणाऱ्या माझी माती माझा देश अभियान राबवण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात देखील माझी माती माझा देश अभियानांतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये अमृत कलश यात्रा काढण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अमृत कलश यात्रा ही उत्साहात काढण्यात यावी याबाबतच्या सूचना ग्रामपंचायत विभागास दिल्या होत्या त्यानुषंगाने ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी वर्षा फडोळ यांनी सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी यांना अमृत कलश यात्रा काढण्याबाबत मार्गदर्शन केले, त्यानुषंगाने नाशिक जिल्ह्यातील १३८८ ग्रामपंचायतींमध्ये अमृत कलश यात्रा या काढण्यात येत आहेत.

भारत न्यूज 1 चैनलला सबस्क्राइब करा आणी शेर करा
वेब चैनल    :- https://bharatnews1.com/
युट्यूब चैनल  :- https://www.youtube.com/@BharatNews1-23
टेलीग्राम चैनल :- https://t.me/bharatnews1newschannel
वॉट्सअप चैनल:- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
फेसबुक.    :- https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

अमृत कलश अभियानांतर्गत प्रत्येक गावात एक अमृत कलश तयार करण्यात येत आहे, या अमृत कलशात प्रत्येक घरातून माती गोळा करण्यात येत आहे, ज्या कुटुंबांकडे शेती आहे अशा कुटुंबातील सदस्यांनी माती व ज्या कुटुंबांकडे शेती नाही अशा कुटुंबातील सदस्यांनी १ चिमुटभर तांदूळ मातीच्या कालशामध्ये जमा करण्यात येत आहे. अशा पद्धतीने प्रत्येक गावातून एक कलश तयार करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात १ सप्टेंबर पासून या अभियानास सुरवात झाली असुन आजपर्यंत ९५७ ग्रामपंचायतींचे अमृत कलश तयार करण्यात आले आहेत. इगतपुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी देखील त्र्यंबकेश्वर येथे अभियानात सहभाग नोंदवून अमृत कलशात माती टाकून सर्व ग्रामपंचायतींनी अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन केले, नाशिक जिल्ह्यात अमृत कलशांच्या शोभायात्रा देखील अनोख्या पद्धतीने काढण्यात येत असून गावातील अबालवृद्ध या अमृत कलश यात्रेत सहभागी होते आहेत. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा देखील या अभियानात सहभाग असून नाशिक जिल्ह्यातील शाळांमधून अमृत कलश यात्रा या काढण्यात येत आहे. मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी या गावातील अमृत कलश यात्रा ही पारंपारिक संबळ वाद्याच्या मिरवणुकीतून काढण्यात आली अशाच पद्धती नाशिक जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीतून कलश यात्रा काढण्यात येत आहे. दि.१ ऑक्टोबर पर्यंत तालुकास्तरावर या कलशांचे संकलन तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे व सर्व गावांमधून गोळा करण्यात आलेल्या कलशातील माती एकत्रित करून तालुका स्तरावर प्रातिनिधिक कलश तयार करण्यात येणार आहे.

Bharat News1
Author: Bharat News1

भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।

वेब पोर्टल चैनल:- https://bhartnews1.com
यूट्यूब चैनल:- https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
व्हाट्सएप चैनल :- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like

Read More