भारत न्युज १ रिपोर्टर योगेश लखोटे -वर्धा ( हिंगणघाट)
वणा नागरिक बँक यांच्या सौजन्याने जुन्या वस्तीतील तेलीपुरा चौक येथे नवयुवक शिवाजी दुर्गा मंदीराच्या वतीने स्व.श्री.राजेंद्र गंडाईत यांच्या स्मृती प्रित्यर्थ तान्हा पोळा -२३ चे यशस्वी आयोजन करण्यात आले.या भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळ्यात 12 वर्षाच्या आतील मुला-मुली करिता वेषभूषा व ऊत्कृष्ट नंदी स्पर्धाचे आयोजन तान्ह्या पोळ्याच्या दिवशी करण्यात आले होते.
या कार्यक्रमात वेशभूषा स्पर्धेत प्रथम विजेता साई नासिरकर याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल ही वेशभूषा करुन अँड. सुधीरबाबू कोठारी यांचे कडून मोठी सायकल हा प्रथम पुरस्कार प्राप्त केला.द्वितीय पुरस्कार हर्षल आमगे ह्याने कालभैरव प्रतिरुप साकार करुन छोटी सायकल स्व.नारायण हवाईकर स्मृती प्रित्यर्थ श्री तुषार हवाईकर यांचे कडून देण्यातआले.तृतीय पारितोषिक दिशा माथूर हिला आजी भिकारणच्या भूमिकेला अभ्यासिका टेबल किशोरभाऊ चांभारे यांचे कडून देण्यात आला व चतुर्थ पारितोषिक पार्थ सायरे याच्या चंद्रयान प्रतिकृतील राजुभाऊ उपाध्ये यांच्याकडून टेबल पंखा देण्यात आले.
उत्कृष्ट नंदी स्पर्धा मध्ये प्रथम पारितोषिक रोहन प्रवीण खैरे याला रा का नेते अतुलभाऊ वांदिले यांच्या कडून मोठी सायकल देण्यात आली ,द्वितीय पारितोषिक प्रवीण रमेश सहारे याला स्व राजेंद्र गंडाईत यांचे स्मृती प्रित्यर्थ प्रविण गंडाईत यांच्या कडून छोटी सायकल देण्यात आली.तृतीय पारितोषिक अभ्यासिका टेबल विरांश नरेश कुंभारे याला धनराजभाऊ कुंभारे यांचे कडून देण्यात आला तसेच चतुर्थ पारितोषिक पार्थ नितीन ठाकरे ह्याला अतुल वैरागडे यांच्याकडून टेबल पंखा देण्यात आला. विशेष म्हणजे या तान्हा पोळ्यात नंदीसह स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व सहाशे स्पर्धकाना वणा नागरिक बँके तर्फे ऊपहार स्वरुपात उत्कृष्ठ अशी शालेय उपयोगी लंच बॉक्स भेट देण्यात आले . या भव्य दिव्य सोहळ्या साठी रा. का. चे ज्येष्ट सहकार नेते अँड. सुधीरबाबू कोठारी, समुद्रपूर बाजार समितीचे सभापती हिम्मतसिंग चतुर, रा. का. प्रदेश सरचिटणीस अतुलभाऊ वांदिले,जेष्ठ पत्रकार सतीश वखरे, रा. का. नेते दशरथजी ठाकरे ,माजी नगरसेवक धनंजय बकाणे, दिलीपजी उजवणे,बालाजी गहलोद, श्रीमती सिमा ताई हवाईकर, समाजसेवक तुषार हवाईकर ,किशोरभाऊ चांभारे,धनराजभाऊ कुंभारे, सौ.अंकिताताई गहलोद हे ऊपस्थित होते. याप्रसंगी एड सुधीरबाबू कोठारी,हिम्मतसिंग चतुर,अतुलभाऊ वंदिले,सतीशजी वखरे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.माजी आमदार राजूभाऊ तिमांडे व वणा ना. बँकेचे संचालक डॉ निर्मेशबाबू सुधीर कोठारी हे व्यस्ततेमुळे प्रत्यक्ष उपस्थीत राहू न शकल्याने त्यानी एका संदेशातून कार्यक्रमाच्या आयोजनाला शुभेच्छा दिल्या. पाहुण्याचे स्वागत सर्वश्री दिलीपजी उजवणे,प्रकाश भजभूजे,गजेंद्र नागोसे, गजू वरघणे,संतोष सहारे,राजू उपाध्ये,अतुल वैरागडे,संजय कावळे व इतर मंदिर सदस्यांनी केले.
या प्रसंगी मार्गदर्शन करतांना अँड. सुधीरबाबू कोठारी यांनी आपली प्राचीन संस्कृतीचे वैभव कायम ठेवण्या साठी या भागातील नवयुवकांनी एकत्र येऊन जो उपक्रम सातत्याने राबवित आहेत त्याबद्दल सर्व नवयुवकांचे अभिनंदन केले.अशा प्रकारच्या या उपक्रमाची त्यानी मुक्तकंठाने प्रशंसा केली.यावेळी अतुलभाऊ वांदिले यांनी या भव्य आयोजनातून एतिहासिक अशा सिन्दी ( रेल्वे) च्या पोळ्याची आठ्वण ताजी झाल्याचे सांगीतले. जेष्ठ पत्रकार सतीशजी वखरे व हिम्मतसिंग चतुर यानी कार्यक्रम आयोजित करणार्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे कौतुक करुन अशा प्रकारच्या आयोजनामुळे समाज संघटीत होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी प्रमुख अतिथीसोबत या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मदत करणारे दिलीपजी उजवणे,बालाजी गहलोद,धनुभाऊ बकाने,तुषार हवाईकर,किशोरजी चांभारे,धनराजभाऊ कुंभारे व मंदिर समितीचे जेष्ठ सदस्य वामनजी गंडाईत,राजू उपाध्ये, अतुल वैरागडे तसेच श्रीमती सिमाताई हवाईकर व सौ.अंकिताताई गहलोद यांचा सत्कार करण्यात आला.वेषभुषा व नंदी परिक्षणाचे काम शहरातील सर्व नामवंत कला शिक्षक प्रमोदजी चौधरी,अरविंदजी दहापुते,रविंद्र मुटे,किशोर भांदककर ,प्रशांत बोरकर,प्रफुल्ल कासार ,यांनी पाहिले व या सर्वांचा सत्कार आयोजन समितीच्या वतीने पाहुण्यांच्या हस्ते करून भेटवस्तू देण्यात आल्या.या दोन्ही स्पर्धे करिता आयोजन समितीचे निरिक्षक म्हणून प्रविण गंडाईत यांनी यशस्वीरित्या काम पाहिले.संचालन प्रास्ताविक हभप मोहन गंडाईत यांनी करून उपस्थितांचे आभार मानले,कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मंदिरच्या जेष्ठ तथा युवा सदस्यांनी अथक परिश्रम करून तान्हा पोळा-२३ चे यशस्वी आयोजन केले.
Join bharatnews1 whatsapp group https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
Join our telegram channel https://t.me/bharatnews1newschannel