अलीकडे जिल्हा परिषद कार्यालयात सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण करणे प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आले आहे. खुर्च्या खिडक्या मोडतोड करणाऱ्या वर फौजदारी खटले करण्यात आले आहे. या प्रकरण मधे सीसीटीवी कॅमेरा मुळे सर्व आरोपींना अटक करण्यात आले आहे बिंदू नामावली प्रकरण चांगलेच तापले आहे चार आरोपींना अटक केली आहे बाकीचे फरारी असलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा परिषद शाळा आणि पंचायत समिती मधून निषेध व्यक्त केला जात आहे आणि काही शासकीय ऑफिस मधील कामकाज बंद ठेवण्यात आले आहे सरकारी कामात कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे आरोपींना जास्तीत जास्त शासन व्हावे अन्यथा यापुढे असे प्रसंग गुन्हेगार वारंवार करत राहील. मनीषा आव्हाळे यांच्यावर झालेला हल्ला अजिबात सहन केला जाणार नाही असे हजारो कर्मचाऱ्याकडून बोलले जात आहे हे प्रकरण गंभीर असून सी ईओ यांनी ऑफिस मधील मोडतोंड करणाऱ्या खुर्च्या खिडक्या यांचे 50 हजार रुपये आरोपीकडून वसूल करावे आणि गुन्हा नोंदवावा अशी मागणी होत आहे आठवड्यातून अशी दोन प्रकरणे जनतेला पहावयास मिळाली अलीकडेच पालकमंत्र्यावर भंडारा उधळण्यात आले होते नंतर आठवड्याभरातच हे दुसरे प्रकरण उघडकीस आले त्यामुळे शासकीय कामात अडथळा होत आहे असे कर्मचारी चर्चा करीत आहेत