भारत न्यूज 1 प्रतिनिधि अक्कलकोट
मराठी हिंदी सिने सृष्टीत कॉमेडी हिरो म्हणून प्रसिद्ध असणारे अतुल परचुरे आपल्या पत्नीसह अक्कलकोट स्वामी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला आले होते अक्षरशः 50 टक्के वजन घटले आहे ही देखील कृपा स्वामी महाराजांची आहे असे परसुरे म्हणत होते मध्यंतरी खूप वजन वाढले होते आता शरीर तंदुरुस्त आहे मध्यंतरी काळात आरोग्य बिघडले होते आता पुन्हा नव्या उमेदीने मी उभारत आहे असे अतुल परचुरे बोलत होते सह्याद्री चॅनलवर आज आता ताबडतोब ही बक्षिसांची मालिका सर्वांचे लक्ष वेधून घेतली होती चांदीचे नाणे बक्षीस देण्यात संपूर्ण महाराष्ट्र फिरलो असे अतुल यांनी बोलून दाखविले.
स्वामी समर्थांची माझ्या जीवनावर मोठी कृपा
अभिनेते अतुल परचूरे यांचे स्वामी दर्शनानंतर वटवृक्ष मंदिरातील मनोगत :- अनेक भाविकांची श्रद्धा स्वामी समर्थावर असते तशी माझीही निस्सीम श्रद्धा श्री स्वामी समर्थांवर आहे. स्वामी समर्थांचे नामस्मरण माझ्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. जीवनातील सर्वच सुख-दुःख प्रसंगी या स्वामींच्या नाम चिंतनाने नेहमीच तारले आहे. मला आठवते की माझ्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी आम्ही सहकुटुंब सहपरिवार न्यूझीलँडला गेलो होतो. अचानक मला पोटाचा त्रास जाणू लागला वैद्यकीय निदानाअंती माझ्या पोटात लिव्हरचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. हे ऐकून माझी मानसिक स्थिती विचलित होऊन मी थक्क झालो होतो. पुढील वैद्यकीय उपचार तेथेच न्यूझीलँडमध्ये घेत असताना स्वामींच्या नामस्मरणात मी खंड पडू दिलेले नाही. सातासमुद्रा पलीकडे न्यूझीलँड मध्येही स्वामी समर्थांची शक्ती माझ्या पाठीशी उभी होती. याची मला त्यावेळी नेहमीच प्रचिती आली व स्वामींचे नाम चिंतन करण्यास मला आणखी बळ मिळाले. यथावकाश कॅन्सरचे निदान यशस्वी होऊन आजार मुक्त होऊन सुखरूप भारतात पोहोचलो. ही सर्व स्वामी समर्थांची कृपा नाही तर काय आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या येथील वटवृक्ष मंदिरात त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा झाल्याने प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वामींचे दर्शन घेतले. स्वामीतर प्रत्यक्षात न्युझीलँड मध्ये माझ्या मागे येऊ शकतात तर मुंबईत का नाही. हा तर एक आभास आहे की अक्कलकोटला येऊन स्वामी दर्शन घ्यायची. प्रत्यक्षात भाविकांना सांगायचे झाल्यास आपण कुठेही असलो तरी शुद्ध अंतकरणाने स्वामींचे नाम स्मरण केल्यास त्यांची कृपारुपी सावली नेहमीच आपल्या जीवनावर असेल असे सांगून स्वामी समर्थांची माझ्या जीवनावर मोठी कृपा असल्याचे मनोगत प्रसिद्ध मराठी सिने व नाट्य कलाकार अतुल परचुरे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी अतुल परचूरे व कुटुंबीयांचा वटवृक्ष मंदिरात श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी परचूरे बोलत होते. यावेळी वटवृक्ष मंदिरातील सुंदर व रमणीय परिसर पाहून जीवन धन्य झाले असेही भावोद्गार परचूरे यांनी काढले. यावेळी मंदिर समितीचे पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, चंद्रकांत सोनटक्के, नरसिंग क्षीरसागर, श्रीशैल गवंडी, अविनाश क्षीरसागर, नागनाथ गुंजले, गणेश इंगळे, दीपक गवळी, विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते.