भारत न्यूज 1 जिल्हा प्रतिनिधी
नायगाव तालुक्यातील कुंटुर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कुंटूर तालुका नायगाव यांच्यावतीने शेड्युल बँक एस्टॅब्लिशन बँक गव्हर्मेंट ऑफ इंडिया विलेज लेवल प्रोग्राम हा घेण्यात आला प्रोग्राम अंतर्गत डोंगरगाव येथील सहा ,घुंगराळा येथील सहा कुंटूर येथील 4 चार एकूण 16 बचत गटाला 26 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले यावेळी सर्व गटातील महिलांनी कर्ज घेऊन आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी विविध व्यवसाय याकडे वळले आहेत. शेळी मेंढी पालन ,गाई म्हशी दूध ,व्यवसाय किराणा स्टोअर ,बांगड्याचा व्यवसाय, भाजीपाला व्यवसाय, अशा विविध व्यवसाय करून आपल्या उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे चालवत आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बँक कुंटुर महिलांच्या अडीअडचणीला धावून आल्याचे वक्तव्य रेखाताई कांबळे यांनी केले आहे . त्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा अधिकारी भीमराव सोनकांबळे यांनी महिला बचत गटांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी महिलांना कर्ज घेऊन आपल्या जीवनातील आर्थिक उन्नती साधावी व आपल्या परिवाराचा चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करावा त्याचबरोबर आपल्या स्वतःची काळजी घ्यावी बँकेचे विविध प्रकारचे योजना घ्याव्यात असे प्रधानमंत्री जन जीवन सुरक्षा विमा योजना ,घ्यावा प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना ,तसेच अटल पेन्शन योजना, ह्या सर्व योजना आपण आपल्या जीवनात आत्मसात कराव्या. साठ वर्षाच्या नंतर पेन्शन मिळेल व आपल्याला जीवनाचा आधार हा बँक होईल असे त्यांनी सांगितले, कुंटुर येथील समूह संसाधन व्यक्ती रेखाताई कांबळे यांनी महिला बचत गटांना मार्गदर्शन करत ,एम आय पी , माहिती असो या सूक्ष्म नियोजन आराखडा या विविध योजनांची विमा काढून घेऊन आपल्या जीवनात फायदा घ्यावा अशे ही यावेळी मार्गदर्शन केले. शाखाधिकारी भीमराव सोनकांबळे यांच्या मार्फत. यावेळी बँक शाखा अधिकारी भीमराव सोनकांबळे ,श्रीकांत गुट्टे ऑफिसर, नागेश कासाराळे , रेखाताई अनिल कांबळे समूह संसाधन व्यक्ती कुंटुर, रमा सोनपारखे डोंगरगाव, सर्व महिला बचत गटाच्या जय महाराष्ट्र महिला बचत गट कुंटुर अध्यक्ष शेषाबाई वाघमारे, सचिव ज्योती वाघमारे, महालक्ष्मी गट गंगाबाई महादळे, माळसा वडे, अहिल्याबाई शेटे , गिरजा माय गट मंगल कारताळे, काशीबाई मोगले, पुजा बिसमिले, शिवंनदा आमबटवाड, कलावंती देवदे, महिला उपस्थित होत्या.